सकाळ  ग्राऊंड रिपोर्ट- यंत्रमागनगरीत आळवलाय धर्मनिरपेक्षतेचा सूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

     धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य-बाह्य अन्‌ बागलाण अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होतेयं. यापूर्वीच्या लढतींमध्ये निर्णायक भूमिका बजावलेल्या मालेगावकरांची आताच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका आहे? हे जाणून घेण्यात आले. त्यावेळी यंत्रमागनगरीतून धर्मनिरपेक्षतेचा सूर आळवला गेला. 

     धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य-बाह्य अन्‌ बागलाण अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होतेयं. यापूर्वीच्या लढतींमध्ये निर्णायक भूमिका बजावलेल्या मालेगावकरांची आताच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका आहे? हे जाणून घेण्यात आले. त्यावेळी यंत्रमागनगरीतून धर्मनिरपेक्षतेचा सूर आळवला गेला. 

     मालेगावमधील किदवाई रोडवरील पहिलवान हॉटेल.... वेळः दुपारची...हॉटेलमध्ये यंत्रमाग कामगार आणि भंगार व्यावसायिकांची गर्दी होती. या गर्दीतील काही जणांनी प्रातिनिधिक स्वरुपात संवाद साधण्यात आला. विशेष म्हणजे, या निवडणुकीबद्दल सामान्य माणूस सजग असल्याचे प्रत्येकाला आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारांबद्दल असलेल्या माहितीवरुन प्रकर्षाने जाणवले. एवढेच नव्हे, तर हाच सामान्य माणूस देशात कोणत्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, प्रचारात नेमके कोणते मुद्दे आलेत आणि त्याच्याशी आपल्या दैनंदिन जगण्याच्या लढाईशी काही संबंध आहे काय? याची सांगड घालणे याबद्दल उत्सुक असल्याचे संवादातून डोकावले. 
     यंत्रमाग व्यवसायाबद्दलच्या सध्यस्थिती विषयी जाणून घेत असताना आपला मालक टिकला, तर आपले खरे याची पक्की जाण कामगारांमध्ये पाहावयास मिळाली. व्यवसायात मंदीचे सावट आहे. मालक अडचणीत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे कामगारांना आर्थिक ताणाला सामोरे जावे लागते, असे खुलेआम सांगणारे यंत्रमाग कामगार बेरोजगारीच्या वाढत्या समस्येविषयी कमालीचा नाराज असल्याचे आढळले. हे कमी काय म्हणून केवळ प्रश्‍न उगाळत बसण्याऐवजी प्रश्‍नांची मुळाशी घाव घालण्यासाठी म्हणून ही निवडणूक महत्वाची असल्याचा विचार कामगारांनी मांडला. मालेगावकरांना कन्हैय्याकुमार ठाऊक आहेत. 

राजकीय आखाड्यातील डावपेच 
खरे म्हणजे, देशभर खेळल्या जाणाऱ्या राजकीय आखाड्यातील डावपेचांबद्दल मालेगावकर दक्ष आहेत. कुणी जिंकावे म्हणून कोण भडक भाषण करत आहे इथंपासून ते मतदानाच्या हक्कापर्यंतच्या प्रत्येक मुद्यांवर कष्टकऱ्यांचे आणि व्यावसायिकांचे आपले म्हणून म्हणणे आहे. हे म्हणणे मांडत असताना कसलाही आडपडदा न ठेवता, कुणाचीही मुलाहिजा न बाळगता थेट नामोल्लेख करुन त्यासंबंधीची उदाहरणे दिली गेलीत. मग मात्र कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी हे मंदिरात जाऊन दर्शन घेतात त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याचक्षणी सगळेच नेते मंदिरात जातात असे उत्तर देत धार्मिक स्थळांबद्दल फारसा आग्रह कष्टकरी आणि व्यावसायिकांमध्ये निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नसल्याचे जाणवले. 

कष्टकरी-व्यावसायिकांच्या व्यथा 
-नोटबंदी आणि जी. एस. टी. ने अधिक नुकसान झाले 
-यंत्रमाग विजेच्या दरापासून कामगार संरक्षणाचा होत नाही विचार 
-अल्पसंख्यांक बहोल कुटुंबांच्या पायाभूत विकासाचा विसर 

 

Web Title: marathi news GROUND REPORT