महाजनादेश यात्रेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 19 ला समारोप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नाशिक ः भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीरसभेने समारोप होणार आहे. विविध भूमिपूजन आणि उद्गाटन कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भाजपकडून निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. भाजपचा ए प्लसच्या वर्गातील पूर्व मतदार संघातून हा बिगुल फुंकला जाणार आहे. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवार (ता.19) सप्टेंबरच्या जाहीरसभेच्या पार्श्‍वभूमीवर आज शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय यंत्रणाची एकत्रित तयारी आढावा बैठक घेतली. बैठकीला, आमदार बाळासाहेब सानप, प्रा.देवयानी फरांदे यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंह आदी उपस्थित होते. श्री महाजन यांनी सकाळी तपोवनातील मैदान पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीची आढावा बैठक घेतली. शहर-ग्रामीण पोलिस विभागाचे आधिकारी उपस्थित होते. बैठकीत तयारीसोबत आंदोलन मोर्चे याची चर्चा झाली. 

प्रचारावर फोकस 
पंतप्रधान श्री मोदी यांच्या दौऱ्यात शहरातील स्मार्ट सिटींतर्गत टायरबेस मेट्रोबस, स्मार्ट रस्त्यासह अनेक कामांचे शुभारंभ होणार आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने येत्या 19 तारखेला भाजपचे एक प्रकारचे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवरचे राजकिय शक्तीप्रदर्शन असणार आहे. भाजप आमदारांना याची जाणीव झाल्याने दुपारनंतर आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील रखडलेल्या कामाच्या पूर्णत्वासाठी लक्ष केंद्रीत केले. पंतप्रधानाच्या दौऱ्यानंतर राज्यात लागलीच आचारसंहिता जाहीर होण्याच्या शक्‍यतेने आमदारांनी त्यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GROUND REPORT