विधानसभेसाठी 19 हजारांनी मतदारांची संख्या वाढली- जिल्हाधिकारी मांढरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नाशिक ः लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात 19 हजारांनी मतदारांची संख्या वाढली आहे. तर चौदाशे ऐवजी 1500 मतदारांचे केंद्र केल्याने यावेळी मतदान केंद्राची संख्या मात्र 134 ने घटली आहे.

नाशिक ः लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात 19 हजारांनी मतदारांची संख्या वाढली आहे. तर चौदाशे ऐवजी 1500 मतदारांचे केंद्र केल्याने यावेळी मतदान केंद्राची संख्या मात्र 134 ने घटली आहे.

निवडणूकीसाठी 35 हजार कर्मचाऱ्यांचे नियोजन असून शहरात 1426 तर ग्रामीण भागात साधारण 3300 पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहीती दिली. 
निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात वाहन जमा करण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी महसूल व पोलिस यंत्रणांची निवडणूक विषयक एकत्रित पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात आचारसंहितेची अंमलबजावणीची सुरु झाल्याचे सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी आधिकारी एस.भुवनेश्‍वरी, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे,निवडणूक आधिकारी कुंदन सोनवणे आदीसह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते. 

28 लाखाची खर्चाची मर्यादा
खाची खर्च मर्यादा उमेदवारांसाठी 28 लाखाची खर्च मर्यादा आहे. यावेळी प्रथमच सोशल मिडियावरील प्रचाराचा खर्च निश्‍चित केला जाणार आहे. उदाहरण बल्क मेसेजपोटी काही कंपन्या 1800 रुपये हजार संदेशाचे घेतात. तद्वतच इतर सोशल मिडीयावरील प्रचाराचा खर्चाचे दर निश्‍चित केले जाणार आहे. शासकीय खर्चातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न मात्र आचारसंहिता भंग समजले जातील. त्यासाठी नागरिकांना 1950 या टोल फ्रि क्रमांकावर तक्रारी करता येतील. याशिवाय सि-व्हिजील व सुविधा या ऍप्लिकेशनद्वारे तक्रारी करता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GROUND REPORT