हज पाठोपाठ उंबरा यात्रेचा मार्ग झाला सुकर,  हज कमिटीचा पुढाकारः

युनूस शेख
शुक्रवार, 28 जून 2019

जुने नाशिक- मिनी हज यात्रा म्हणून ओळखली जाणारी मानाची "उंबरा यात्रा' आता सुकर बनणार आहे. त्यासाठी हज कमिटीने महत्वपूर्ण पुढाकार घेतला असून यंदाच्या हजयात्रेनंतर लगेचच मुस्लीम बांधवांसाठी उंबरा यात्रेचे कमिटीतर्फे नियोजन केले जाणार आहे. आतापर्यंत खासगी टूरद्वारे ही यात्रा केली जात होती. त्यामुळे काही टुर ऑपरेटर यात्रेकरूकडून आव्वाच्या सव्वा रक्कम उकळत होते. हज कमिटीच्या पुढाकारामुळे लुटणार करणाऱ्या या टुर ऑपरेटरला चाप बसणार आहे. शिवाय यात्रेकरूंच्या पैशाची बचत होण्यास मदतच होईल. अशी माहिती हज कमिटीचे समन्वयक जहिर शेख यांनी गुरुवारी झालेल्या हज प्रशिक्षण शिबीराच्या निमित्ताने दिली. 

राज्य हज कमिटीतर्फे आतापर्यंत दरवर्षी हज यात्रेचे आयोजन करून यात्रेकरूंना सवलतीच्या दरात यात्रा ती घडवून आणली जात होती. पण काही मुस्लिम बांधवाना हज यात्राही करणे शक्‍य नसल्याने ते उंबरा यात्रा करण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून उंबरा यात्रेस जाणाऱ्याची संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसते. आतापर्यंत ही यात्रा केवळ खाजगी टूरद्वारे केली जात होती. त्यामुळे काही टूर ऑपरेटरकडून जास्त रक्कम उकळली जात होती, तर काहीजण यात्रेच्या नावाखाली पैसा गोळा करून पसार होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. विविध पोलिस ठाण्यात तसे गुन्हेही दाखल झाले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करत उंबरा यात्रेचे आपणच काय नियोजन करू नये,असे हज कमिटीने ठरवले आणि त्यानुसार यंदाच्या वर्षापासूनच या यात्रेची सफर घडवली जाणार आहे. लवकरच त्यास मंजूरी मिळेल अशा प्रकारची माहिती राज्य हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी गुरुवारी (ता.20)मालेगाव येथे झालेल्या हज प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना दिली असल्याचे श्री. शेख यांनी सांगितले. 

"मक्का'ला उभारणार महाराष्ट्र सदन 
देशातील यात्रेकरुंसाठी "मक्का शरीप' येथे महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचबरोबर ओझर येथून थेट सौदीपर्यंत विमानसेवा देण्याचा मानसही सिद्धीकी यानी बोलून दाखविल्याचे शेख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मेहराम कोट्यातही महिलांसाठी सुमारे 300 ने वाढ केली आहे. 
.... 
सौदीत फडकणार तिरंगा 
यंदाही 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र दिना दरम्यान हज यात्रा येत असल्याने देशातील भाविकांकडून सौदी येथे तिरंगा फडकवत स्वातंत्र दिन साजरा करण्याचे नियोजन असेल. त्यानिमित्ताने यात्रेंकरू सोबत तिरंगा घेऊन जाणार आहे. गेल्या वर्षी "मिना' येथे स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला होता. यंदा मक्का येथे यात्रेकरूंना स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची ही संधी मिळणार आहे. 

मेहराम कोठ्यात वाढ 
महिलांसाठी विशेष मेहराम कोटा असतो. गेल्या वर्षापर्यंत या कोट्याची संख्या दोनशे होती.त्यात तीनशेने वाढ करत ती संख्या पाचशेवर पोहचली आहे. . एखाद्या कुटूंबातील इतरांना यात्रेस जायचे आहे, पण त्या कुटूंबातील एखाद्या महिलेचा नंबर न लागल्यास या कोट्यातून तिला यात्रा पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होते. पण असे नंबरही लकी ड्रॉ ने काढले जातात. 

यात्रेस जाणाऱ्या भाविकांची संख्या 
ठिकाण हज कमिटी खाजगी टूर (सुमारे) एकून 
देशातून 1 लाख 60 हजार 40 हजार 2 लाख 
राज्यातून 15 हजार 5 हजार 20 हजार 
जिल्हा 1 हजार 100 600 1 हजार 700 
शहर 215 150 365 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news haaj yatra