हज यात्रा-२०२० ची सर्व प्रक्रिया ऑनलाइन! 

राजू कवडीवाले
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

यावल : मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रा-२०२० साठीच्या सर्व प्रक्रियांत यावर्षी प्रथमच डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. हज यात्रेसाठी आजपासून १० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे महिनाभरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. भाविकांना ‘व्हिसा’ची व्यवस्थाही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. 

यावल : मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रा-२०२० साठीच्या सर्व प्रक्रियांत यावर्षी प्रथमच डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. हज यात्रेसाठी आजपासून १० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे महिनाभरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. भाविकांना ‘व्हिसा’ची व्यवस्थाही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. 

हज यात्रा-२०२० साठीच्या तयारीसंदर्भात दिल्ली येथे हज कमिटीच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली, तीत श्री. नक्वी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की हज यात्रा-२०२० साठी शंभर टक्के ऑनलाइन, डिजिटल असेल. सर्व भविकांसाठी ‘ई- व्हिसा’ उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे मोबाईल अॅपवरूनही भाविक अर्ज दाखल करू शकणार आहेत. 

२२ ठिकाणांहून जाण्याची व्यवस्था 
हज यात्रा-२०१९ साठी संपूर्ण भारतातून २१ ठिकाणांहून हज यात्रेसाठी जाण्याची व्यवस्था होती. आता २०२० साठी त्यात विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून नवीन व्यवस्था करण्यात आल्यामुळे यापुढे आता एकूण २२ ठिकाणांहून हज यात्रेस जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

भारतातून प्रथमच दोन लाख भाविक 
अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले, की २०१९ ची हज यात्रा ही ऐतिहासिक राहिली. भारताच्या इतिहासात प्रथमच दोन लाख भारतीय भाविकांनी हज यात्रा पूर्ण केली, तीही अनुदानाविना. अनेक ठिकाणांहून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना विमानभाडे होण्याचा लाभ मिळाला. हज यात्रा- २०१९ साठी देशाच्या २१ ठिकाणांहून सुमारे पाचशे विमाने उड्डाणाद्वारे दोन लाख भाविकांनी हज यात्रा पूर्ण केली. 

कोट्यात वाढीचा असाही लाभ 
भारतीय भाविकांच्या कोट्यात वाढ झाल्याने त्याचा देशातील अनेक मोठ्या राज्यांना लाभ मिळाला आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, बिहार आदी राज्यांतील ज्या भाविकांनी हज यात्रा- २०१९ साठी नावनोंदणी केली होती, त्या सर्व भाविकांना लाभ मिळाला. हज कोट्यात वाढ झाल्याने त्या सर्वांची नावे यादीत समाविष्ट झाली. हज यात्रा- २०२० साठी मुंबई येथील ‘हज हाउस’मध्ये माहिती, मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र हज यात्रा प्रक्रियांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news haj yatra 2020 online booking