विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या हात धुण्याच्या सवयी 

live
live

नाशिक : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत "आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि हात धुण्याची प्रात्यक्षिके करून या सवयीचे महत्व त्यांना पटवून देण्यात आले. 

हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात त्याचे महत्त्व ठसवावे, या विषयी जनजागरण व्हावे, म्हणून 15 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हात धुवा दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने व महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडी येथे हातधुवा कार्यक्रमाचे नियोजन केले होते. 

जिल्ह्यात सर्व प्रथमिक शाळा व अंगणवाडी येथे या दिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येवून हात धुण्याविषयी जनजागृती करण्यात आली. अस्वच्छ हातांमुळे कशाप्रकारे आजार होतात, हात केव्हा धुतले पाहिजेत याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात येवून हात धुण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत, ग्रामस्वच्छता समिती, निर्मलग्राम समिती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, बचत गट, आदींचा सहभाग घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com