लक्ष्मी-कुबेरपूजन 

नरेंद्र धारणे (नाशिक)
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

आश्‍विन अमावस्येला लक्ष्मी-कुबेरपूजन करतात. ज्याला आपण दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन म्हणतो. हे पूजन प्रामुख्याने अलक्ष्मी निघून जावी म्हणूनसुद्धा असते. अलक्ष्मी निस्सारण विधीमध्ये प्रांतनिहाय फरक आढळतो. काही प्रांतात विशिष्ट मंत्रांचा उच्चार करून पाणी शिंपडतात. काही प्रांतात घटातील जाळे-जळमटे काढून स्वच्छता केली जाते. 

आश्‍विन अमावस्येला लक्ष्मी-कुबेरपूजन करतात. ज्याला आपण दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन म्हणतो. हे पूजन प्रामुख्याने अलक्ष्मी निघून जावी म्हणूनसुद्धा असते. अलक्ष्मी निस्सारण विधीमध्ये प्रांतनिहाय फरक आढळतो. काही प्रांतात विशिष्ट मंत्रांचा उच्चार करून पाणी शिंपडतात. काही प्रांतात घटातील जाळे-जळमटे काढून स्वच्छता केली जाते. 

............... 
लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी झाल्यावर घरात सर्वत्र माळा-तोरणे बांधून मंगल वाद्यसुरात लक्ष्मीपूजन केले जाते. एका ताम्हणात चलनी नाणी, सोने अथवा चांदीची लक्ष्मी घेऊन पूजन केले जाते. काही जण दर वर्षी नाण्यांची भर टाकतात. अशा प्रकारे पूजा केल्याने घरात लक्ष्मीवास राहतो. संपत्ती प्राप्त होणे, हे एकवेळ सोपे आहे. मात्र, लक्ष्मी-संपत्ती प्राप्त झाल्यावर अंगी मद, अहंकार, दंभ, व्यसनाधीनता हे दुर्गुण शिरू न देणे महत्त्वाचे असते. हे दुर्गुण म्हणजेच अलक्ष्मी होय. याचेच अलक्ष्मी निस्सारण करायचे असते. म्हणूनच बुधवारी (ता. 7) लक्ष्मीपूजनाबरोबर अलक्ष्मी निस्सारण व कुबेरपूजन करतात. कुबेर ही धनदेवता आहे. कुबेराचा सहवास परमवैराग्यशील शंकराशी असल्याने ते लक्ष्मीपुत्रांना कधीही उन्मत्त होऊ देत नाही. कुटुंबांत निवासस्थानी लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी दुकानात पूजन करतात. 
पूजेसाठी भाताच्या लाह्या आणि साखरफुटाणे वापरतात. भाताच्या लाह्या हे कर्माचे प्रतीक आहे. हातून कर्मयोग होत राहतो, पण त्याचा लेश आपणाला स्पर्श करत नाही. व्यापारउदिमाचे कार्य आपणाकडून होत राहते. मात्र, त्याच्या नफा-नुकसानाचे परिणाम आपल्या मनावर होत नाही. मनाचा समतोल राहतो. साखरफुटाणे (बत्तासे) हे गोडीचे प्रतीक आहे. वाणी आणि कृती जिकती गोड तितकी जीवनात संपन्नता येते. 
वहीपूजन 
व्यापारी याच दिवशी लक्ष्मीपूजनासह हिशेब लिहिण्याच्या वहीचे पूजन करतात. अमावस्येला म्हणजेच शून्यावस्थेत कार्यारंभ झाल्यास तो प्रतिपदेपासून कलेकलेने वाढत जाऊन उत्कर्षास जातो. म्हणजेच व्यापारात खूप नफा होतो. त्यामुळे शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. 

Web Title: marathi news happy diwali laxmi pujan

टॅग्स