प्रतिकूल वातावरणामुळे सर्दी-खोकल्याने नागरिक हैराण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून प्रतिकूल वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दिवसाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे, तर त्या तुलनेमध्ये रात्री गारवा निर्माण होऊन किमान तापमानातही चढ-उतार होतो आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

आठवडाभरापूर्वी वातावरणातून अचानक थंडी गायब झाली होती. दिवसाच्या कमाल तापमानातही मोठी वाढ होऊन 30 अंश सेल्सिअस पलीकडे जात 32 अंशांपर्यंत गेले होते. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होऊन तापमान 15-16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. त्यामुळे थंडी गायब होऊन उकाडा जाणवू लागला होता; परंतु गेल्या आठवड्यात पुन्हा वातावरणात बदल झाला. सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण होत असून, किमान तापमानातही सातत्याने घट होऊन ते 10 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर दिवसाचे तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहत आहे. 

या प्रतिकूल हवामानामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये अति सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागली आहेत. वयोवृद्धांना खोकल्याचा त्रास होतो आहे. 

स्वाइन फ्लूचा धोका 
प्रतिकूल वातावरण हे स्वाइन फ्लूसाठी पोषक असते. सर्दी-खोकल्याच्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्‍यता असते. खोकल्यामुळे घशात खवखवणे व नंतर अतितापाने फणफणणे ही प्रमुख लक्षणे स्वाइन फ्लूची आहेत. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांनी तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

Web Title: marathi news health related