आरोग्य विद्यापीठाच्या तिघा कंत्राटी उपोषणार्थीची तब्येत खालावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, व ज्योती पेखळे असे या तिघा महिलांची नावे आहेत. 

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, व ज्योती पेखळे असे या तिघा महिलांची नावे आहेत. 

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासनाने न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली होती. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलिस कवायत मैदानावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना कर्मचाऱ्यांनी घेराव घातला होता.

दहा कर्मचाऱ्यांकडून गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू होते. आज सकाळी उपोषणात सहभागी असलेल्या काहींना अस्वस्थ वाटू लागले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, डॉक्‍टर घटनास्थळी दाखल झाले. तसेच अस्वस्थ असलेल्यांपैकी काहींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, ज्योती पेखळे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान चार दिवस होऊनही विद्यापीठ प्रशासन, जिल्हा प्रशासनातर्फे आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्‍त करण्यात आला. संतप्त कर्मचाऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. आणखी काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडत चालली असून अन्य कर्मचारी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेऊन आहेत. कुठलेही कारण न देता तोंडी कामावरून कमी केलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन द्यावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. 

राज्य सरकारी कर्मचारी संघटना, 
बाजारीकरण विरोधी मंचचा पाठिंबा 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करून साखळी उपोषण संपवावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मुकूंद दीक्षित, वासंती दीक्षित, सचिन मालेगावकर, डॉ. मिलींद वाघ, छाया देव यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे प्रसिद्धस दिलेल्या पत्रात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पाठराखण केली आहे. अध्यक्ष दिलीप थेटे, कार्याध्यक्ष महेश आव्हाड, उपाध्यक्ष दिलीप सानप, सरचिटणीस सुनंदा जरांडे, रं. ग. महाजन यांच्या प्रसिद्धी पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. 
 

 

Web Title: MARATHI NEWS HEALTH UNIVERSITY