विद्यापीठाच्या निधी प्राध्यापक,विद्यार्थीनी संशोधनासाठी उपयोग करावा:  कुलगुरू डॉ. म्हैसेकर

residentional photo
residentional photo


नाशिक : वैद्यकीय शास्त्रात प्रत्येक पॅथीचे वेगळे महत्व आहे. होमिओपॅथीतील क्षमता सिद्ध करण्याची जबाबदारी विद्यार्थी, प्राध्यापकांची आहे. त्यासाठी संशोधनावर भर द्यावा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्राध्यापकांसाठी दोन कोटी, विद्यार्थ्यांसाठी एक कोटी रूपये निधी राखीव आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करत संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. 

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्र होमिओपॅथी परीषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. विक्रम काळे, नवी दिल्लीतील केंद्रीय होमिओपॅथी परीषदेचे उपाध्यक्ष डॉ.अरुण भस्मे, सदस्य डॉ.एस. एम. देसरडा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाचे अधिष्ठाता डॉ.धनाजी बागल, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र ठाकरे, प्राचार्य डॉ.स्वानंद शुक्‍ला उपस्थित होते. 

कुलगुरू म्हैसेकर म्हणाले, की विद्यापीठातर्फे नवीन वर्षापासून सर्व विद्याशाखांचे पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. शोधप्रंबधदेखील प्रसिद्ध केले जाणार असून, त्यात होमिओपॅथीच्या शोधप्रबंधांचाही सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. 

डॉ.भस्मे म्हणाले, की होमिओपॅथीला राजमान्यता आहे, परंतु राजाश्रय नाही. महाविद्यालये सुरू झालीत, परंतु त्यातील जागा रिक्‍त राहतात. ग्रामीण भागातील प्राथमिक केंद्रांवर, ग्रामीण रूग्णालयांत होमिओपॅथी डॉक्‍टरांची नियुक्‍ती करावी. 
होमिओपॅथीशी निगडीत विविध प्रश्‍नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरवा करणार असल्याचे आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी दिले. 

खासदार चव्हाण, आमदार काळे 
यांच्यात शाब्दीक चकमक 

होमिओपॅथीशी निगडीत प्रश्‍न केंद्रात मांडण्यासाठी खासदारांना इंग्रजीत मुद्दे लिहून द्यावेत. ते संसदेत मागण्या मांडतील, अशी खोचक टिका शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली. सध्याच्या राज्यसरकारचे थोडेच दिवस बाकी आहेत, त्यामूळे त्यांच्याकडून मागण्या मान्य करून घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. यावर प्रतिउत्तर देतांना खासदार चव्हाण म्हणाले, की ऐंशीच्या दशकात मी इंग्रजी पदवीधर असून, संसदेत विषय मांडण्याचा दीर्घ अनुभवदेखील आहे. मराठी, गुजराथी व चांगल्या प्रकारे इंग्रजीसह चार भाषांत मुद्दे मांडू शकतो. राहीला प्रश्‍न सरकारचा, तर केंद्रात मोदी तर राज्यात फडणवीस यांचीच सत्ता येईल, असा दावा करत आमदार काळेंचे मुद्दे खोडून काढले. 

डॉक्‍टरांवरील खोटो गुन्हे 
मागे घेतले जाणार : डॉ.ठाकरे 

डॉक्‍टरांवर होणाऱ्या कारवायांसंदर्भात मंत्री गिरीष बापट यांचीा भेट घेतली असून अन्न व औषध प्रशासनातर्फे डॉक्‍टरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वास त्यांनी दिले असल्याचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र ठाकरे यांनी सांगितले. होमिओपॅथी परीषदेतर्फे ई-लॅब्ररीद्वारे पुस्तके तसेच ऍपद्वारे सदस्यांना सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com