शहरात 159 हिश्‍ट्री शिटरची माहीती अद्यावत 

residentional photo
residentional photo

नाशिक ः शहर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शहरात महत्वाच्या झोपडपट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवित, 159 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले. 
शहरातील गुन्हेगारांची पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस मुख्यालयातील बराक 17 येथे ओळख परेड राबवित, गुन्हेगारांची 
नविन छायाचित्र, त्यांचा अहवाल, सध्या ते कोठे राहतात, काय काम करतात याविषयाची माहीती अद्ययावत करण्यात आली. 
 

  नाशिक शहरात पून्हा एकदा घरफोड्या, चेन स्नचिंग चोरी, जबरी चोऱ्या, हाणामाऱ्या, खुन, खुनाचे प्रयत्न वाढले असून, त्यापार्श्‍वभूमीवर पोलीसांनी ही मोहीम राबविली. 
मंगळवारी मध्यरात्री एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबवण्यात आली. त्यात एकाच वेळी वेगवेगळ्या झोपडपट्यांमध्ये हिस्ट्री शिटर गुन्हेगारावर कारवाई करीत, 
पोलिसांनी 159 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शहरात घडलेल्या गुन्ह्यांची आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यात आली. संशयित 
सध्या काय काम करतात, कोठे राहतात, त्यांचा कोणाच्या संर्पकात आहेत यासह त्यांचे छायाचित्र घेऊन ती माहिती अद्ययावत करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com