स्वातंत्र्यदिन,पतेती,शनिवार,रविवारमुळे हॉली डे फिवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नाशिक : सलग सुट्या कधी येतात, याकडे हल्ली सर्वांचेच लक्ष लागलेले असते. उद्या (ता.15) स्वातंत्र्य दिन यानंतर शुक्रवारी (ता.17) पारशी नूतन वर्ष पतेतीची सुट्टी असून त्यास जोडून विक एंड आल्याने सुट्यांचे जंगी नियोजन केले जाते आहे. या हॉलीडे फिव्हरमध्ये नागरीकांकडून हॉटेलींग, आऊटींगच्या नियोजनास प्राधान्य दिले आहे. यातही तरूणाईचा पुढाकार असल्याचे चित्र आहे. 

      स्वातंत्र्य दिन खासगी, सरकारी कार्यालयांना सुट्टी असते. तर शाळा, महाविद्यालयांमध्ये सकाळी कार्यक्रम झाल्यानंतर उर्वरित दिवसभर सुट्टी दिली जाते. या पार्श्‍वभुमिवर हा दिवस कुटुंबातील सदस्य, मित्र-परीवारासोबत घालविण्यासाठीचे नियोजन आहे  स्वातंत्र्य दिनाची सुट्टी व त्यानंतर एका दिवसाच्या फरकाने पतेतीची सुट्टी असल्याने अनेकांनी गुरूवारी (ता.16) सुट्टी टाकत सलग सुट्यांचा आनंद घेण्याचे नियोजन आखले आहे. 

सलग सुट्यांमुळे नजीकच्या ठिकाणांला भेट देत आऊटींगचे नियोजन आखले जात आहे. तर काहींना जाणे शक्‍य नसेल, अशांकडून स्नेहभोजनाचे नियोजन केले जात असल्याने हॉटेल्समध्येही गर्दी बघायला मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनी "गोल्ड' अन्‌ "सत्यममेव जयते'मध्ये टक्‍कर 
स्वातंत्र्यदिन व त्याला लागून आलेल्या विक एंडचे औचित्य साधत देशभक्‍तीवर आधारीत दोन चित्रपट प्रदर्शित होता आहेत. अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भुमिका असलेला "गोल्ड' आणि अभिनेता जॉन अब्राहिम व मनोज बाजपेयीची भुमिका असलेला "सत्यममेव जयते' एकमेकांना भिडणार आहे. दरम्यान या चित्रपटांमुळे सार्वजनिक सुट्या व आठवडे सुट्यांमध्ये नागरीकांना मनोरंजनाची संधी उपलब्ध झाली आहे. गोल्ड या चित्रपटासाठी मल्टीप्लेक्‍समध्ये रोज 26 शो होणार असून सत्यमेव जयते चित्रपटासाठीही रोजचे 25 शो असतील

खरेदीचा उत्साह द्विगुणित 
स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यावसायिकांकडून योजनांचा पाऊस सुरू झालेला आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपासून तर स्मार्टफोन व अन्य गॅझेट्‌सवर घसघशीत सवलती दिल्या जात आहेत. या योजनांमुळे खरेदीचा उत्साह द्विगुणित होतो आहे.

Web Title: marathi news holiday fever