175 ग्राहकांच्या घरपट्टीवर 40 लाखांहुन अधिक बोजा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नाशिक- महापालिकेतर्फे अतिक्रमाणांवर कारवाई केल्यानंतर त्याचा खर्च संबंधितांकडून वसुल केला जातो. पण गेल्या वर्षभरात महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमांपैकी 175 अतिक्रमण धारकांनी झालेला खर्च भरून दिल्याने 175 ग्राहकांच्या घरपट्टीवर चाळीस लाख 33 हजार रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. 

 पालिकेतर्फे शहरात कुठेना कुठे अतिक्रमण मोहिम राबवली जाते. सन 2014 पर्यंत अतिक्रमण हटविताना होणारा खर्च महापालिकेच्या वतीने केला जात होता.अंदाजपत्रकात खर्चाची बाजू दिसतं असल्याने व अतिक्रमण धारकांनी एकीकडे अतिक्रमण करून पैसे कमवायचे व दुसरीकडे महापालिकेने स्वताची यंत्रणा वापरून ती अतिक्रमणे तोडायची हि अव्यवहार्य बाब तत्कालिन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या लक्षात आल्यानंतर अतिक्रमणाचा खर्च संबंधिताकडून वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

Web Title: marathi news house tax