राज्यात नशिकचा सर्वात कमी 86.13 टक्‍के निकाल

residenational photo
residenational photo

नाशिक : इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी एकला ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला आहे. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागाचा निकाल 86.13 टक्‍के लागला आहे. विभागाचा निकाल राज्यात सर्वात निच्चांकी आहे.

विभागातील 987 कनिष्ठ महाविद्यालयातील 1 लाख 60 हजार 284 विद्यार्थ्यांनी 226 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती. त्यातून 1 लाख 38 हजार 055 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण 82.71 टक्‍के असून तर 90.63 टक्‍के मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. गुणपत्रिका (मार्कशीट)चे वाटप 12 जूनला दुपारी तीनपासून केले जाणार आहे. 

बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांकडून संकेतस्थळाद्वारे निकाल पाहण्याची लगबग सुरू झाली होती. गेल्या वर्षी मार्च 2017 ला नाशिक विभागाचा निकाल 88.22 टक्‍के इतका होता. त्यात यंदाच्या वर्षी 2.09 टक्‍याने घसरण झालेली आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यात महसूल, जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकांनी केलेली कारवाई, परीक्षेदरम्यान धुळे, नंदुरबार येथे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र संचालकांची केलेली बदली यामूळे परीक्षा पद्धती कडक होती. त्यामूळे निकालात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. 

    दरम्यान विभागाचा निकाल विभागीय सचिव आर. आर. मारवाडी यांनी पत्रकार परीषद घेऊन जाहीर केला. उद्या (ता.31) पासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह छायाप्रतीसाठी 19 जून तर गुणपडताळणीसाठी 9 जूनपर्यंत शुल्क भरुन छायाप्रत मिळविता येईल. श्रेणी, गुणसुधार योजनेसाठी परीक्षेस पुर्नप्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध राहील. इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै, ऑगस्टमध्ये होणाऱ्या तसेच फेब्रुवारी, मार्च 2019 मध्ये होणाऱ्या परीक्षा देण्याची संधी मिळेल. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षेसाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com