इगतपुरीतील जिल्हा परिषदेची शाळा आता वेबसाईटवर

विजय पगारे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

इगतपुरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या भगतवाडी येथील प्राथमिक शाळा आज पासुन वेबसाईटवर पोहोचली आहे. अनेक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या या शाळेने दुर्गमतेवर मात करीत गगनभरारी घेतली आहे. 

इगतपुरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या भगतवाडी येथील प्राथमिक शाळा आज पासुन वेबसाईटवर पोहोचली आहे. अनेक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या या शाळेने दुर्गमतेवर मात करीत गगनभरारी घेतली आहे. 

आज शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सचिव प्राची साठे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक् शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या हस्ते http://Zpsbhagatwadi.ivtr.in या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. Indian Visionary Technology And Research (ivtr) यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी वेबसाईट तयार करुन घेतली. अंधश्रद्धेकडुन विज्ञानाकडे झालेला शाळेचा विकास व त्यासाठी राबविलेले उपक्रम वेबसाईट मध्ये मांडण्यात आलेले आहेत शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणारे मनिषा वाळवेकर, मंगेश जाधव व पेहेचान प्रगती फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने हे साध्य करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, गटशिक्षणाधिकारी किरण कुवर, शिक्षण विस्तार अधिकारी बी. जी. गरड , ए. के. मुंढे, एस. आर. अहिरे, राजेश तायडे, श्रीराम आहेर, तानाजी खडागंळे व आदी उपस्थित होते. यावेळी सिद्धार्थ सपकाळे, दिलीप बोराडे, उमेश बैरागी, राजेंद्र मोरकर, सागर जळगावकर, अनिस शेख, सोनाली निकम, प्रतिभा गवळे, आरती बोराडे व इगतपूरीतील तसेच राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी http://Zpsbhagatwadi.ivtr.in या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Marathi news igatouri news zp school website launch