एमएस-सीआयटी अभ्यासक्रम आता स्मार्ट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

इगतपुरी - सध्याच्या "स्मार्ट' युगात महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कंपनीने एमएस-सीआयटी हा अभ्यासक्रम अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात काळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केला आहे. पुस्तकेही अधिक आकर्षित करत त्यात ऑगमेंटेड रिऍलिटीचा वापर करण्यात आला.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला संगणकाची ओळख व्हावी, या उद्देशाने "एमकेसीएल'ने एमएस-सीआयटी या शासनमान्य अभ्यासक्रमाची सुरवात केली होती. बदलत्या काळानुरूप या अभ्यासक्रमात बदल करून स्पीच-टू-टेक्‍स्टचा वापर, ऍनिमेशन, गेम्सशी संबंधित प्रोग्रॅमिंगच्या संकल्पना, ई-सेवांचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पुस्तकात दिलेल्या ऑगमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञानामुळे "एमकेसीएल'च्या मोबाईल ऍपमधून पुस्तकातील संबंधित फोटो स्कॅन केल्यावर त्याचा व्हिडिओ पाहणेही विद्यार्थ्यांना शक्‍य होणार आहे. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कौशल्यांसोबतच सॉफ्ट स्किल्सही वापरता यावे, या उद्देशाने या कौशल्यांसाठीही अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

बारावी उत्तीर्णांसाठी बीबीए अभ्यासक्रम
"एमकेसीएल'ने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा पदवी शिक्षण अभ्यासक्रमही सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना शिकताना नोकरीचा अनुभवही घेता येणार आहे, अशी माहिती "एमकेसीएल'ने जाहीर केली आहे. याबरोबरच 26 नवे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

Web Title: marathi news igatpuri news mscit syllabus education