विद्रुपीकरण करणाऱ्या जाहीरातदार,अतिक्रमणधारकांवर फौजदारी गुन्हे

residentional photo
residentional photo

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने तयार होत असलेल्या स्मार्ट रस्त्यावर विद्रुपीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जाहिरात दारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाल्याने त्यापाठोपाठ आता रामकुंड, नेहरू उद्यानासमोरील अतिक्रमण धारकांवर देखील फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. 

  स्मार्ट सिटी अंतर्गत नेहरु उद्यानाचे पुर्ननिर्माण करण्यात आले आहे. वाहतुक बेटाचे स्वरुप मिळालेल्या या बेटाला मात्र अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. येथील अतिक्रमणाची समस्या नवीन नाही यापुर्वी देखील महापालिकेने अनेकदा कारवाई केली. दादागिरीला सामोरे जावे लागले. महापालिकेने अंतिम उपाय म्हणून उद्यानाच्या भोवती संरक्षक भिंत बांधली परंतू त्यावरही ताबा घेवून चायनिजच्या गाड्या तेथे लागल्या, मद्यपान देखील सुरु झाल्याने सर्वसामान्य नाशिककर उद्यानापासून दुरु गेला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानाचे सुशोभिकरण झाल्यानंतर परिस्थिती बदलण्याची अपेक्षा होती परंतू जैसे-थे परिस्थिती असल्याने आयुक्तांनी फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com