कम्पाऊंडीग पॉलिसी अंतर्गत नऊशे हून अधिक प्रस्ताव दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नाशिक : अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य शासनाने आखलेल्या प्रशमन संरचना धोरणांतर्गत (कम्पाऊंडिंग पॉलिसी) पालिकेच्या नगरचना विभागामध्ये आज पर्यंत नऊशे प्रस्ताव दाखल झाले आहेत. धोरणात सहभागी होण्यासाठी अद्यापही चार दिवस शिल्लक असल्याने या कालावधी मध्ये दोन हजारांहून अधिक प्रकरणे मार्गी दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

राज्य शासनाने 31 डिसेंबर 2015 पर्यंतचे अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी कम्पाऊंडिंग धोरण आखले आहे. यापुर्वी सहा महिने मुदतवाढ मिळालेल्या धोरणांतर्गत 31 मे 2018 या कालावधी पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची संधी आहे. आतापर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची गती अगदी कमी होती. शनिवार पर्यंत अवघे चारशे प्रस्ताव दाखल झाले होते.

 गेल्या दोन दिवसात कम्पाऊंडींग साठी प्रस्ताव दाखल करण्याचा वेग वाढला आहे. तब्बल नऊशे प्रस्तावांची नोंद झाली असून अद्यापही शंभर प्रस्तावांची इनवर्ड वहीत नोंद होणे बाकी आहे. गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. जून नंतर दाखल झालेल्या प्रस्तावानुसार जागेवर जावून एफएसआयचे किती प्रमाणात उल्लंघन झाले आहे. याची पाहणी अभियंत्यांच्या मार्फत केली जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक रक्कम निश्‍चित करून ती भरल्यानंतर अनाधिकृत बांधकामे अधिकृत केली जाणार आहे. 
 
Web Title: marathi news incrochment problem