एक दोन नव्हे तब्बल साडेदहा हजार खाती एकाच दिवसात....इंडियन पोष्ट बॅंकेचा अनोखा प्रयत्न

live
live

जुने नाशिक- टपाल विभागाच्या नाशिक विभागाकडून काल (ता.20)  महामेळावा घेण्यात आला. त्यात एका दिवसात विभागातून इंडियन पोस्ट बॅंकेची 10 हजार 600 खाती उघडण्याचा विक्रम करण्यात आला असून आतापर्यत वर्षभरात चाळीस हजार खाती उघडण्यात आली आहे. अशी माहिती जीपीओ टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्तर एस.आर. जाधव यांनी दिली. 

जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत इंडियन पोस्ट बॅंक पोहचावी. त्यानी टपाल बॅंकेच्या मार्फत त्यांचे सुरक्षीत आर्थिक व्यवहार करावे. यानिमित्ताने टपाल विभागाच्या नाशिक विभागाकडून शुक्रवारी (ता.20) रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या माध्यमातून नागरीकाना टपाल बॅंकेचे खाते उघण्यासाठी प्रवृत्त करत खाते उघडण्यात आले. 100 रुपयांनी एका दिवसात तब्बल 10 हजार 600 खाती उघडण्यात आली.

बारा लाखाची ठेव प्राप्त

या माध्यमातून 12 लाखांची ठेव बॅंकेस प्राप्त झाली. यासाठी जीपीओ टपाल कार्यालय बाहेर तसेच शहराच्या विविध शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी तसेच नागरीकांसाठी बॅंकेचे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले होते. शिवाय डाक सेवक (पोस्टमन) यांनी घरोघरी जावून नागरीकाना बॅंकेची माहिती समजून सांगत खाते उघण्यासाठी प्रवृत्त केले. विभागात येणाऱ्या ग्रामिण भागातील डाक सेवकांनी मोठ्या उत्साहात त्याची कामगीरी केल्याने इतक्‍या मोठ्या प्रमाणात खाती उघण्यात यश आल्याचेही श्री. जाधव यांनी सांगीतले. सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत डाक सेवकानी आप-आपल्या भागात खाते उघडण्याचा उपक्रम राबवला. 

अधिकार आणि कर्तव्य 
ग्रामिण भागातील डाक सेवकानी त्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी महामेळाव्याच्या एक दिवस अगोदर एकदिवसीय उपोषण करत त्यांच्या अधिकाराची विभागास जाणीव करुन दिली. तर दुसऱ्या दिवशी लगेचच नागरीकांच्या घरोघरी जावून त्याना बॅंकेची खाते उघण्यास प्रवृत्त करत खाती उघडत आपले कर्तव्यही तितक्‍यास जिद्दीने पार पाडले. 

सकाळी 6 वाजता पहिले खाते 
सिन्नर वडांगळी येथील डाक सेवक सतीश तुपे यांनी सकाळी 6 वाजता येथील शेतीच्या बांधवार जावून महामेळाव्याचे पहिले खाते उघडले. सर्वानी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर अन्य नागरीकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे अन्य गावातील तसेच शहरातील डाक सेवकानी थंडीची काळजी न करता. रात्री उशीरापर्यंत त्यांचे कर्तव्य पार पाडले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com