आमदार जे.पी.गावितांचे पुत्र इंद्रजीत गावित भाजपच्या वाटेवर ? मुख्यमंत्र्यांच्या वर्षा भेटीने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सुरगाणा-  कळवण विधानसभेचे विद्यमान आमदार जे.पी.गावित यांचे पुत्र.व सुरगाणा पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती इंद्रजीत गावित यांनी आज रात्री साडे नऊला पितापुत्रांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे कळवण-सुरगाणा विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी गुढघ्यांला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या छातीत धडकी भरली आहे.

 'रात्रीच खेळ चाले'  मालिकेप्रमाणे या बंद दाराआड गुप्तगू भेटीने कळवण विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उलट सुलट चर्चा सुरू असून चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसापुर्वीच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमदार जे.पी.गावित यांनी माकपच्या कार्यकर्ते समवेत चव्हाणांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी तास दिड तास मोकळी चर्चा झाली होती.त्यातमध्ये काही कार्यकर्ते यांनी चव्हाणांना सांगितले तुम्ही जर निवडणूक लढविणार नसाल तर गावित यांना मदत करा अशी विनंती केली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news indrajeet gawait