घसरताक्रम टाळण्यासाठी इंदूरचा अभ्यास करून त्रुटी दूर करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नाशिक महापालिकेच्या घसरलेल्या क्रमवारीची कारणमिंमासा करण्यासाठी देशात पहिल्या आलेल्या इंदूर शहराचा घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पाहणी दौरा केला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्वच्छ भारत अभियान दरवर्षी राबविले जाते. पहिल्या वर्षी देशातील 73 शहरांमध्ये नाशिक 31 व्या क्रमांकावर होते. दुसऱ्या वर्षी 474 शहरांच्या स्पर्धेत 151 व्या क्रमांकावर क्रमवारी घसरली. गेल्या वर्षी 4141 शहरांचा स्पर्धेत समावेश कर्यात आला होता. केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या शहरांचा वर्गवारीत नाशिक 63 व्या स्थानावर आले होते. सातत्याने क्रमवारी घसरतं असल्याने इंदूर शहराचा दौरा करून नाशिक मध्ये काय त्रुटी राहिल्या याचा अभ्यास केला जाणार आहे.

Web Title: marathi news indur committe visit