उद्योजिकेला जीवे ठार मारण्याची धमकी, कामगारांवर खंडणीचा गुन्हा  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील जेएम इंजिनिअरिंगतील संपावर असलेल्या कामगारांनी कंपनीच्या उद्योजिकेला रस्त्यात अडवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कंपनी बंद पाडण्याची आणि मुलांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी हिना दिपेश चांगराणी (रा. महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिसात संशयित प्रशांत जगताप, तुषार गौड, सागर सुखलाल बडगुजर, सचिन देशमुख, गोकूळ साळुंखे, वसंत शिरोळ यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिना चांगराणी यांची सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये जेएम इंजिनिअरिंग या नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये सीआयटीयु या कामगार संघटनेची युनियन असून गेल्या काही दिवसांपासून या युनियनशी संबंधित कामगारांनी अनधिकृतरित्या संप पुकारला आहे. यासंदर्भात तडजोडीच्या उपाययोजनाही करून झाल्या. पण तरीही संप मिटलेला नाही. दरम्यान, गेल्या शनिवारी (ता.5) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कंपनीतील संपावरील संशयित कामगार प्रशांत जगताप, तुषार गौड, सागर बडगुजर, सचिन देशमुख, गोकुळ साळुंखे यांनी अन्नापूर्णा हॉटेलजवळ हिना चांगराणी यांना अडविले आणि त्यांच्याकडे संप मिटविण्यासाठी पैशांची मागणी केली.
 हिना चांगराणी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, संशयितांनी कंपनी बंद पाडण्याची धमकी देत, त्यांच्या मुलांसह त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गेल्या सोमवारी (ता.7) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली हिना चांगराणी यांच्या मालकीची होंडा सिटी कारला (एमएच 15 सीटी 8838) आयशर ट्रकने पाठीमागून धडक देत नुकसान केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात संशयितांविरोधात खंडणीचा व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पालकमंत्र्यांकडेही मागितली दाद 
जेएम इंजिनिअरिंगमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सीटू युनिटनच्या कामगारांनी अनधिकृतरित्या संप पुकारला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही युनियनकडून आडमुठ्ठेपणा केला जात आहे. त्यासंदर्भात कंपनीच्या हिना चांगराणी यांनी पालकमंत्र्यांकडेही दाद मागितली होती. मात्र त्यातही अपयश आले. दरम्यान, संशयितांकडून सातत्याने हिरा चांगराणी यांना धमकावले जात असून गेल्या आठवड्यात तर थेट त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 
 
Web Title: marathi news industrialist workers

फोटो गॅलरी