आयटी कंपन्यांत पुढील वर्षीअखेर "क्‍लाउड'चा वापर पोहचेल 45 टक्‍यांवर 

अरूण मलाणी
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिक : झपाट्याने वाढत चाललेल्या उद्योगांत आयटी क्षेत्राचे नाव आघाडीवर घेतले जाते. बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अवलंब करत सदैव अद्ययावत राहणे आयटी उद्योगांना क्रमप्राप्त ठरते. याच अनुषंगाने आयटी उद्योग "क्‍लाऊड कम्प्युटींग' तंत्रज्ञान स्वीकारताय. नुकताच समोर आलेल्या सर्वेक्षणानुसार 2019 संपेपर्यंत सुमारे 45 टक्‍के आयटी उद्योग क्‍लाऊड कम्प्युटींगच्या वापराला सुरवात करतील.

सन 2022 पर्यंत एकंदरीत 43 टक्‍के उद्योग क्षेत्रात क्‍लाउंड कम्प्युटींगच्या वापराला सुरवात झालेली असेल. या तंत्राच्या सहाय्याने वीज बिलाची बचत करण्यासह हार्डवेअरवर होणारा खर्च टाळणेही शक्‍य होणार आहे. 

नाशिकच्या ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. कंपनीने परीस्थितीचा अंदाज घेत वाढत चाललेल्या ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी "इंटेल'च्या प्लॅटफॉर्मवर तयारी केलेली आहे. नाशिक व मुंबई (महापे) येथे डेटा सेंटर कार्यरत असून लवकरच बंगळूरू येथील डेटा सेंटरदेखील सुरू केला जाणार आहे.

ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी ईएसडीएसतर्फे पेटंट प्राप्त ई-नाईट क्‍लाउंड तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याने ग्राहकांनाही त्याचा फायदा होऊ शकणार आहे.  

जगभरातील आटी उद्योगांमध्ये क्‍लाउड तंत्रज्ञानाच्या वापराकडे कल वाढतो आहे. 2015 सालपर्यंत क्‍लाउडचा वापर साधारणत: 22 टक्‍के असतांना 2017 सालपर्यंत वाढून 35 टक्‍यांपर्यंत पोहचला होता. तंत्राच्या वापरात सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता, 2019 पर्यंत आयटी उद्योगांकडून क्‍लाउड कम्प्युटींगचा वापर 45 टक्‍यांपर्यंत पोहचेल, असे नुकताच एका सर्वेक्षणानुसार समोर आले आहे.

आयटी क्षेत्राप्रमाणे उर्वरित उद्योग क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून 2022 पर्यंत 43 टक्‍के उद्योग क्षेत्र क्‍लाउडचा वापर करतांना दिसेल. क्‍लाउड कम्प्युटींगद्वारे डेटा थेट डेटा सेंटरवर साठविला जात असल्याने हार्डवेअरवर होणारा मोठा खर्च टळू शकणार आहे. याशिवाय उद्योगांना वीज बिलात बचत करणे शक्‍य होणार असून त्यातून एकंदरीत खर्चात बचत होऊन नफा वाढविण्यास सहाय्यता होणार आहे. 

असे आहे ईनाईट तंत्रज्ञान 
पेटंट मिळविलेल्या ईनाईट हे व्हर्टीकल ऑटो स्केलींग तंत्रज्ञानावर आधारीत आहे. या तंत्रज्ञानात सीपीयु व रॅम यांच्यात योग्य समन्वय साधतांना अधिक गतीशिलपणे संगणक हाताळणीची सुविधा उपलब्ध होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हे तंत्रज्ञान असंख्य ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवान सेवा देण्यास मदत करते. 

ईएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक,पीयुष सोमाणी म्हणाले, ईएसडीएस.आयटी क्षेत्राकडून क्‍लाउड कम्प्युटींग तंत्रासाठी वाढणारी मागणी लक्षात घेता इंटेलच्या प्लॅटफॉर्मवर सेवा पुरविण्याची आम्ही तयारी केली आहे. अधिकाधिक ग्राहकांना सेवा पुरविण्यास या माध्यमातून मदत होईल. नाशिकसह मुंबई व बंगळूरू स्थित डेटा सेंटर व ब्रिटनमधील डेटा सेंटरच्या माध्यमातून सुविधा पुरवणार असून ग्राहकांचीही वीज बिल व हार्डवेअरवर होणाऱ्या खर्चात याद्वारे बचत होईल. 
 
Web Title: marathi news it company clouds use