"अपक्षां'चाही वाजतोय निवडणुकीत डंका : 81 जणांची उमेदवारी 

"अपक्षां'चाही वाजतोय निवडणुकीत डंका : 81 जणांची उमेदवारी 

जळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. महापालिका निवडणुकीत तर एका प्रभागात चक्क 23 हजार मते असून, तब्बल 20 किलोमीटरची फेरी उमेदवाराला करावी लागते. अशा स्थितीत त्याला पक्षाचीच उमेदवारी फायदेशीर ठरते. मात्र, या परिस्थितीतही काही जण "अपक्ष' उमेदवार म्हणून लढण्याचे धाडस करतात आणि विजयाचीही त्यांना अपेक्षा असते. अशाच काही "अपक्षां'चाही यंदाच्या निवडणुकीत डंका वाजतोय. 

प्रभाग क्र. 2 मध्ये योगेश कदम 
प्रभाग क्र. 2 मधील "ड' गटात एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. यात तीन पक्षांचे उमेदवार आहेत, तर योगेश संजय कदम हा तरुण "अपक्ष' म्हणून मैदानात आहे. त्याच्या घराण्यात राजकीय वारसा नाही, वय अवघे 25 वर्षे आहे. पदवीपर्यंत शिक्षण झाले असून तो डेस्कटॉप इंजिनिअर आहे. सामाजिक कार्याची आवड असलेला योगेश तीन पक्षांच्या उमेदवारांशी लढा देत आहे. प्रभाग क्र. 2 हा शिवाजीनगर ते कांचननगर असा आहे. 

प्रभाग क्र. 8 मध्ये जयश्री बोरसे 
प्रभाग क्र. 8 हा हिरा-शिवा कॉलनी, कृषी विद्यापीठ, निमखेडी गाव असा परिसर आहे. यातील "ब' गटात चार महिला उमेदवार आहेत. त्यात तीन उमेदवार पक्षांतर्फे आहेत, तर एकमेव जयश्री श्रावण बोरसे "अपक्ष' लढत आहेत. त्या मूळ भारतीय जनता पक्षाच्या आहेत. मात्र, ऐन निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी "अपक्ष' उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचा या प्रभागात चांगला संपर्क आहे. त्यामुळे जनता त्यांना कौल देणार काय? याचीच प्रतीक्षा आहे. 

प्रभाग क्र. 11 मध्ये किरण बोंडे 
प्रभाग क्र. 11 हा कोल्हेनगर, हरिविठ्‌ठलनगर, विद्युत कॉलनी असा परिसर आहे. यातील "ड' गटात तीन उमेदवार आहेत. त्यात किरण संजय बोंडे "अपक्ष' लढत आहेत. त्या पदवीधर असून ग्राफिक डिझायनर आहेत. शिवाय त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांचे पती संजय यांचा सामाजिक कार्यात सहभाग आहे. श्री. बोंडे सन 1996 मध्ये "अपक्ष', 2002 मध्ये त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा बोंडे "अपक्ष', तर 2008 मध्ये भाऊ महेश बोडे, तर 2013 मध्ये किरण बोंडे यांनी "राष्ट्रवादी'कडून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना यश जरी मिळाले नसले तरी त्यांनी टक्कर चांगली दिली. त्यांचे डिपॉझिट कधीही जप्त झाले नाही. विशेष म्हणजे दरवेळी त्यांना मतांचा मिळणारा प्रतिसाद वाढलेला आहे. प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी त्या लढा देणार आहेत. प्रभागात त्यांचा दांडगा संपर्क असल्याने यावेळी त्यांना विजयाची आशा आहे. 

प्रभाग क्र. 7 मध्ये प्रवीण पाटील 
प्रभाग क्र. 7 हा चंद्रप्रभा कॉलनी, आनंदनगर, विष्णूनगर, शिवकॉलनी, आर. एम. एस. कॉलनीचा प्रभाग आहे. "ड' गटात पाच उमेदवार असून, प्रवीण संतोष पाटील "अपक्ष' लढत आहेत. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. धावडे (ता. अमळनेर) येथील ते मूळ रहिवासी आहेत. आमदार सुरेश भोळे यांचे ते सन 2006 पासून स्वीय सहाय्यक आहेत. परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य सुरू असते. ते मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी "अपक्ष' उमेदवारी दाखल केली आहे. प्रभागात केलेल्या सामाजिक कार्याची जनता दखल घेऊन यश पदरात टाकेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. 

ैऍड. सत्यजित पाटील मैदानात 
प्रभाग क्र. 13 "ड' मधून ऍड. सत्यजित पाटील मैदानात आहेत. त्र्यंबकनगर, हतनूर कॉलनी, आदर्शनगर, संभाजीनगर, मोहननगर, विवेकानंदनगर असा हा परिसर आहे. या प्रभागात सात उमेदवार आहेत. यात ऍड. सत्यजित पाटील "अपक्ष' लढत आहेत. ऍड. पाटील मूळ शिवसेना व "मनसे'चे कार्यकर्ते आहेत. "मनसे'त ते तीन वर्षे होते. परंतु आता त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. परंतु तरीही पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी "अपक्ष' उमेदवारी केली आहे. यापूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून सन 2003 मध्ये शिवसेना, तर 2008 मध्ये भाजप आणि 2014 मध्ये "मनसे'कडून उमेदवारी दाखल केली होती. यावेळी ते "अपक्ष' असून या परिसरात त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. या बळावर त्यांना यावेळी यश मिळण्याची अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com