दहा हजारांची लाच मागणाऱ्या परिरक्षण भूमापकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जळगाव : नगर-भूमापन कार्यालयातील प्रॉपर्टी कार्डातील चूक दुरुस्त करण्यासाठी मिळकतदाराकडून दहा हजारांची लाच मागणाऱ्या परिरक्षण भूमापकास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ऑक्‍टोबर महिन्यात या महिला कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केली होती, त्याची शहानिशा आज पूर्ण होऊन कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

जळगाव तालुक्‍यातील रहिवासी तक्रारदार यांच्या आजीच्या नावात शासकीय नोंदीत (रेकॉर्डवर) चुकीची नोंद झालेली आढळून आली होती. ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी ते, नगर- भूमापन (सिटी सर्व्हे) कार्यालयात गेले असता संगीता सुकलाल वर्दे (वय-45, रा. वाघनगर जळगाव) यांनी या कामासाठी तक्रारदारास दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी घडल्या प्रकारात लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठून या प्रकरणी पुराव्यानिशी तक्रार केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाल ठाकूर यांच्या पथकातील नीलेश लोधी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आज दुपारी लाचेच्या मागणीसंदर्भात तक्रारीची शहानिशा केली. त्यानुसार श्रीमती वर्दे यांना अटक करण्यात आली. 

संभाषणाची तपासणी 
श्रीमती वर्दे यांनी दहा हजारांच्या लाचेबाबत मागणी केल्याची शहानिशा त्यांच्या आज झालेल्या फोनवरील संभाषणावरुन करण्यात आली. त्यासाठी पंच बोलावण्यात आले. पंचांसमक्ष तपासणी झाल्यानंतर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: marathi news jalgaon 10 thousand lach bhumapak arrest