जिल्ह्यात अकरा तालुक्‍यांत पावसाची "सेंच्युरी' 

जिल्ह्यात अकरा तालुक्‍यांत पावसाची "सेंच्युरी' 

जळगाव : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या जळगाव जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची कृपा झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा दुप्पट पाऊस झाला असून, सप्टेंबरच्या पंधरवड्यालाच जिल्ह्यात अकरा तालुक्‍यांनी "सेंच्युरी' पार केली आहे. आता उर्वरित 15 दिवसांत, परतीच्या पावसाने अन्य चार तालुकेही शंभरी पार करतील, अशी आशा आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही चांगला जलसाठा झाला आहे. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासह खानदेशात सातत्याने दुष्काळ पडला. गेल्यावर्षी तर अवघा 60 टक्के आणि तोदेखील अनियमित पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण खानदेश व जळगाव जिल्हाही दुष्काळ, टंचाईमध्ये होरपळून निघाला. टॅंकरच्या संख्येने तर दोनशेचा आकडा गाठला होता, अशी स्थिती जिल्ह्याने अनुभवली. 

यंदा पावसाची कृपा 
यावर्षी मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यावरही पावसाची विशेष कृपा राहिली आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात सरासरीच्या तीस टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर अद्याप पावसाचे पंधरा दिवस शिल्लक असताना पावसाने शंभरी पार केली आहे. 

अकरा तालुक्‍यांत सरासरी 
सप्टेंबरच्या 15 तारखेलाच जळगाव जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने 103.7 टक्के हा आकडा गाठला आहे. तर जिल्ह्यातील अकरा तालुक्‍यांत शंभरी पार केली आहे. यापैकी सर्वाधिक 123.8 टक्के पाऊस रावेर तालुक्‍यात, त्याखालोखाल 117 टक्के पाऊस यावल तालुक्‍यात झाला आहे. सर्वांत कमी म्हणजे 81.8 टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्‍यात झाला आहे. चाळीसगावसह भडगाव, धरणगाव व जामनेर या चार तालुक्‍यांना अद्याप पावसाच्या "शंभरी'ची प्रतीक्षा आहे. 

तालुकानिहाय पाऊस असा 
तालुका------- पाऊस (मिमी)--- टक्के 
जळगाव-------657.2-------95.5 
जामनेर -------755.7------104.7 
एरंडोल -------717.2------115.2 
धरणगाव------584.2-------93.8 
भुसावळ ------733.5------109.6 
यावल---------826.3-----117 
रावेर---------827.5--------123.8 
मुक्ताईनगर----647.6------103.4 
बोदवड--------700.6-----104.7 
पाचोरा--------748.8-----100.7 
चाळीसगाव----540.3----- 81.8 
भडगाव -------629.4-----93.9 
अमळनेर-------598.9-----102.9 
पारोळा--------636.8------103.1 
चोपडा -------726.7------105.3 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com