जिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढता-वाढता वाढे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

जळगाव ः जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोलखोल जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत 47 टॅंकरची संख्या वाढली आहे. सध्या 147 गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसून, तेथे 130 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 
जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी 91 टॅंकर होते. पाच दिवसांत ती संख्या 102 पोहोचली. आज तर चक्क 130 वर पोहोचली आहे. 

प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी 36 कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी विविध गावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकरची संख्या चाळीसगाव तालुक्‍यात 26 गावांना 29 आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये अमळनेर तालुका आघाडीवर होता. आता चाळीसगाव तालुका आघाडीवर आहे. 
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात 242 गावांना 247 विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. 46 गावांना 43 ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. 54 गावांना 99 विहिरी मंजूर आहेत. 38 गावांना 52 नवीन कूपनलिका सुरू केल्या आहेत. 45 गावांमध्ये विहीर खोलीकरणाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, चोपडा या गावांना अद्याप टॅंकर सुरू नाहीत. 

टॅंकर सुरू असलेली गावे व टॅंकरसंख्या 
तालुका--गावे--संख्या 
जळगाव--2-2 
जामनेर--24--25 
भुसावळ- 6-7 
मुक्ताईनगर-1--1 
बोदवड--4--3 
पाचोरा-9--9 
चाळीसगाव-26--29 
भडगाव-4-5 
अमळनेर- 42--23 
पारोळा--27-22 
एकूण--147-130 
 
Web Title: marathi news jalgaon 130 tranker 147 village