अरे बापरे ! धुळे जिल्ह्यात 14 हजार "होम क्वारंटाइन' 

अरे बापरे ! धुळे जिल्ह्यात 14 हजार "होम क्वारंटाइन' 

धुळे ः "कोरोना'चे सावट असताना जिल्ह्यात परदेशासह देशातून ठिकठिकाणाहून आलेल्या तब्बल 14 हजार व्यक्तींना सक्तीने चौदा दिवसांसाठी "होम क्वारंटाइन'चा सल्ला आरोग्य यंत्रणेने दिला आहे. या व्यतिरिक्त प्रभावी कामकाज नसलेल्या महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 210 जण "होम क्वारंटाईन' आहेत. विदेशासह कोरोना बाधित राष्ट्र आणि पुणे, मुंबई, गुजरात आदी ठिकठिकाणाहून हे नागरिक जिल्ह्यात मूळ गावी आले आहेत. 

कोरोना बाधित क्षेत्रातून आणि या क्षेत्राबाहेरून सुरक्षिततेसाठी 20 ते 22 हजाराहून अधिक नागरिक धुळे जिल्ह्यातील मूळ गावी आले आहेत. संसर्गजन्य "कोरोना' विषाणू 14 दिवसात लक्षणे दाखवितो. त्यामुळे शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून सूचीत व्यक्तींनी चौदा दिवस घरात स्वतंत्रपणे राहाणे व दिलेल्या सूचनेचे पालन करणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यात अशा आजपर्यंत 14 हजार व्यक्‍ती "होम क्वारंटाइन' असल्याची माहिती यंत्रणेने दिली. यात सर्वाधिक सहा हजार व्यक्ती साक्री तालुक्‍यातील असून उर्वरित शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यातील आहेत. धुळे शहरातून नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही. मनपाच्या दाव्यानुसार 210 व्यक्ती "होम क्वारंटाईन' आहेत. 

"तंबाखू'साठी एक जण बाहेर 
साक्री रोडवरील मोगलाई भागातील "होम क्वारंटाईन' असलेली एक व्यक्ती शहरात सर्रास फिरत होती. त्याला मनपा इमारतीजवळ मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले व शंका आल्याने त्याची विचारपूस केली. शेवटी त्याला जुन्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ पकडले. "होम क्वारंटाईन'चा शिक्का दोनदा पुसल्याचेही त्याने यावेळी सांगितले. विशेष म्हणजे तंबाखू घेण्यासाठी बाहेर पडल्याचेही बहाद्दराने सांगितले. ही व्यक्ती दौंड येथून शहरात आलेली असून त्याला "होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. त्याला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com