शहरात ऑक्‍टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जळगाव ः उन्हाळ्यात वाघूर धरणाचासाठा कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा दोन दिवसांवरून तीन दिवसाआड केला होता. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने वाघूर 
धरण 85 टक्के भरले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा दोन दिवसाआड केला जाणार असून तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर 3 ऑक्‍टोबरपासून पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जाणार आहे. 

गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. जळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. उन्हाळ्यात वाघूर धरणाचासाठा 18 टक्‍क्‍यावर आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले होते. परिणामी शहरातील दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला. मात्र जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून वाघूर धरण 85 टक्के भरले आहे. काही दिवसापूर्वी महापौर सीमा भोळे यांनी आयुक्तांना पत्र देवून शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 3 आक्‍टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी दिली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 2 days waer suply octomber