"आरटीई'अंतर्गत 2 हजार विद्यार्थी पात्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जळगाव : आरटीईअंतर्गत 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 3 हजार 717 जागांपैकी 2 हजार 12 विद्यार्थी पात्र ठरवून त्यांना भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस देवून प्रवेश निश्‍चित करण्यासंदर्भात संदेश देण्यात आला होता. ही प्रवेश प्रक्रिया 26 एप्रिलपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आरटीईअंतर्गत 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अखेरच्या दिवसापर्यंत 6 हजार 868 अर्ज प्राप्त झाले होते. 3 हजार 717 जागांपैकी 2 हजार 12 विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात पात्र करण्यात आले. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 26 एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यात प्रवेश निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत 1 हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. निवड झालेल्या शाळेत मुदतीत प्रवेश न घेतल्यास त्यांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही असेही एसएमएसद्वारे संदेश दिला आहे. प्रथमच यावर्षी जिल्हास्तरावरुन प्रवेश न होता ऑनलाइन अर्ज नोंदणी पुणे येथे करण्यात आली. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर आरटीई प्रवेश अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 1 हजार 705 विद्यार्थ्यांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील आरटीई प्रवेश पात्र अर्जाकडे पालकांचे लक्ष लागून आहे. 

Web Title: marathi news jalgaon 2 thousand RTE student