बावीस हजार मतदारांनी उमेदवारांना नाकारले!   

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीत जळगावकर मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) मोठ्या प्रमाणावर वापर करीत उमेदवारांना नाकारल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. शहरात एकूण 56 टक्‍के मतदान झाले. पैकी 21 हजार 981 मतदारांनी "नोटा'चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले आहे. 

जळगाव ः महापालिका निवडणुकीत जळगावकर मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) मोठ्या प्रमाणावर वापर करीत उमेदवारांना नाकारल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. शहरात एकूण 56 टक्‍के मतदान झाले. पैकी 21 हजार 981 मतदारांनी "नोटा'चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले आहे. 
निवडणूक प्रक्रियांमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांबद्दल अनेकांमध्ये नाराजी असते. मतदानाचा हक्‍क बजवायचा, म्हणून इच्छा नसताना अनेकदा उमेदवाराला मतदान करावे लागत असते. यामुळे निवडणुकीतील उमेदवारांपैकी एकालाही मत द्यायचे नसल्यास मतदाराला "नोटा'चा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणूनच महापालिका निवडणुकीत जळगावकर मतदारांनी "नोटा'चा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचा फटका चुरशीच्या लढतीत पराभूत झालेल्या उमेदवारांना बसला. 
 
प्रभाग दहामध्ये सर्वाधिक "नोटा' 
महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण दोन लाख तीन हजार 407 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला; या मतदारांकडून 8 लाख 9 हजार 180 मते दिली आहेत. परंतु या मतदारांमधील तब्बल 21 हजार 981 मतदारांनी म्हणजे मतदानाच्या 2.72 टक्‍के मतदारांनी "नोटा'चा वापर केला आहे. यामध्ये प्रभाग दहामधून सर्वाधिक एक हजार 730 जणांनी मतदारांनी उमेदवारांना नाकारले, तर प्रभाग दोनमधून एक हजार 700 जणांनी नकार दर्शविला आहे. 
 
प्रभागनिहाय "नोटा'चा वापर 

प्रभाग 1 ः 1410 
प्रभाग 2 ः 1700 
प्रभाग 3 ः 1586 
प्रभाग 4 ः 1521 
प्रभाग 5 ः 1554 
प्रभाग 6 ः 1178 
प्रभाग 7 ः 1043 
प्रभाग 8 ः 955 
प्रभाग 9 ः 878 
प्रभाग 10 ः 1730 
प्रभाग 11 ः 1421 
प्रभाग 12 ः 879 
प्रभाग 13 ः 964 
प्रभाग 14 ः 1081 
प्रभाग 15 ः 659 
प्रभाग 16 ः 1101 
प्रभाग 17 ः 1088 
प्रभाग 18 ः 477 
प्रभाग 19 ः 454 
 

Web Title: marathi news jalgaon 22 thaousand voter nota