जिल्ह्यात 56 हजार शेतकऱ्यांना 293 कोटी रुपये कर्जाचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020


जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कर्ज जिल्हा बॅंकेने दिले आहे. राष्ट्रीय बॅंकेने 29 कोटी, खासगी बॅंकेने 49 कोटी, ग्रामीण बॅंकेने सर्वांत कमी 1 कोटी 80 लाखांचे कर्जवाटप केले. 

जळगाव :  खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे पूर्णत्वाकडे आलेली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांना बॅंकांकडून कर्ज घेणे शक्‍य झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्व बॅंकांमिळून 56 हजार 811 शेतकऱ्यांना 293 कोटी 53 लाखांचे कर्ज वाटप केले, अशी माहिती सहकार विभागाने दिली आहे. 

क्‍लिक कराः पांढरे सोने विक्रीसाठी बळीराजा होतोय पिवळा 
 

जिल्ह्यात "कोरोना'चा सामना करताना "लॉकडाउन' सुरू आहे. जळगाव "रेड झोन'मध्ये असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू झालेले नाहीत. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांना "लॉकडाउन'मधून शेतीकामांना सूट दिली आहे. अद्याप कपाशीचे बियाणे उपलब्ध न झाल्याने खरीपपूर्व हंगामात शेतकऱ्यांना कपाशीची पेरणी करता आलेली नाही. शेतकऱ्यांनी खरिपासाठी पीककर्ज काढण्यास सुरवात केली आहे. ज्यांचा सातबारा कोरा आहे अर्थात ज्यांच्याकडे थकबाकी नाही अशांना बॅंका पीककर्ज देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कर्ज जिल्हा बॅंकेने दिले आहे. राष्ट्रीय बॅंकेने 29 कोटी, खासगी बॅंकेने 49 कोटी, ग्रामीण बॅंकेने सर्वांत कमी 1 कोटी 80 लाखांचे कर्जवाटप केले. 

आर्वजून पहा : नाशिकहून रात्री आला; चिठ्ठीवर आई- वडीलांचा नंबर लिहून केले असे 

बॅंक--सभासद--कर्जवाटप 
जेडीसीसी--56 हजार 670--212 कोटी 61 लाख 
राष्ट्रीयीकृत बॅंक--1706 --29 कोटी 17 लाख 
खासगी बॅंका--1274--49.95 
ग्रामीण बॅंका--161--1 कोटी 80 

दहा हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित 
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात सुमारे दहा हजारांवर शेतकरी कर्जमुक्‍तीपासून वंचित आहेत. जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आतापर्यंत 594 कोटी, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी 135 कोटींची कर्जमुक्ती दिली आहे. शासनाने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ लवकर दिल्यास खरिपाचे कर्ज घेण्याचा मार्ग सुकर होईल, अशी भावना शेतकऱ्यांची आहे. 

नक्की वाचा :  जळगावात येथे होता हायप्रोफाईल कुंटनखाना; महाविद्यालयीन युवतींना घेतले ताब्यात 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 293 crore loan disbursed to 56 thousand farmers in the district