जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्‍यात अतिवृष्टी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

जळगाव ः जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात संततधार पाऊस झाल्याने धरणगाव, यावल, अमळनेर व चोपडा या तालुक्‍यात 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात संततधार पाऊस झाल्याने धरणगाव, यावल, अमळनेर व चोपडा या तालुक्‍यात 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. 
अतिवृष्टी झालेल्या तालुक्‍यात धरणगाव (81.3 मिमी), यावल (78.4), अमळनेर (71.3), चोपडा (87.1) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या 63 टक्‍के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात हतनूर धरण 32.39 टक्‍के, गिरणा 58. 59 टक्‍के तर वाघुर 34. 49 टक्‍के भरले आहे. दरम्यान संततधार पावसाने शेतात पाणी साचून राहत असल्याने पिकांवर किड रोगाचा पादुर्भाव झाला आहे. दरम्यान हतनुर धरणात प्रचंड पाणी साठा झाल्याने 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून, धरणातून 2 लाख 14 हजार 109 क्‍युसेक वेगाने पाणी नदी पात्रात सोडले जात आहेत. यामुळे तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून काही नागरीकांना स्थलांतराचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जामनेर:शहरातील कांगनदी पात्रामधे सकाळी-सकाळी शौचास गेलेल्या साठ वर्षीय ईसमाचा अचानक पुराचे पाणी वाढल्याने वाहुन जाऊन बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 4 taluka ativrushti 60 mm rain