महामार्ग चौपदरीकरणाला पुन्हा "ब्रेक' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

जळगाव ः शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्र. 6 च्या चौपदरीकरण कामाला 15 जुलैपासून सुरू करण्यास राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, तब्बल पंधरा दिवस उलटूनही अद्याप हे काम सुरू होत नसल्याचे चित्र आहे. जर ठेकेदार अधिकाऱ्यांचे ऐकत नसेल, लोकप्रतिनिधींनी तंबी दिल्यावरही काम सुरू केले जात नसेल, तर अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींबाबत ठेकदारांमध्ये असलेली भीती संपली असल्याचे बोलले जात आहे. कसेबसे सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले आहे. 

महामार्ग चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महामार्गावरील वाढलेली वाहतूक व अपघातांच्या घटनांमुळे हे काम तत्काळ मार्गी लागावे म्हणून आंदोलने, साखळी उपोषणेही झाली. समांतर रस्त्यांऐवजी आता महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. चौपदरीकरणाचे काम गुडगावच्या झंडू इन्फ्रास्ट्रक्‍चरला स्वीकृतीबाबतचे पत्र देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच कराराची प्रक्रियाही पूर्ण झाली. त्यानंतर 15 जुलैपासून संबंधित कंपनीने कामाचे आदेशही दिले. खासदार उन्मेष पाटील यांनीही महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्यांना त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे 19 जुलैला शहरातील चौपदरीकरण कामाचा प्रारंभ होणार होता. मात्र, तोही झाला नाही. यावरून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींची चौपदरीकरणाबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट होत नसल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. 
सुमारे सत्तर कोटी निधींतून चौपदरीकरणाचे काम केले जाणार असून, हरियानातील "झंडू इन्फ्रास्ट्रक्‍चर' या कंपनीने हे काम हाती घेतले आहे. यात कालिंकामाता मंदिर ते खोटेनगरपर्यंत चौपदरीकरणाचे काम होणार आहे. 

या ठिकाणी असतील उड्डाणपूल 
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत महामार्गावरील डॉ. विश्‍वेश अग्रवाल हॉस्पिटल, गुजराल पेट्रोलपंप, खोटेनगर येथे उड्डाणपूल असतील; तर अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौकात "रोटरी जंक्‍शन' (गोल) असतील. त्या ठिकाणी महापालिकेतर्फे चौकाचे सुशोभीकरण करण्यात येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 4 way road work break