अनामत म्हणून भरली पाच हजारांची चिल्लर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज अथवा अनामत रक्कम भरली गेली नाही. आज दुसऱ्या दिवशी 
दुपारी अपक्ष उमेदवार नवनाथ दारकुंडे यांनी त्यांचा व पत्नी जोत्स्ना दारकुंडे यांचा अर्ज भरण्यासाठी तब्बल पाच हजारांची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात भरून "बोहनी' केली. मात्र ही चिल्लर मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. आज दिवसभरात इच्छुकांकडून 60 हजार रुपये अनामत रक्कम जमा झाली. 

महापालिका निवडणूक एक ऑगस्टला असून निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (4 जुलै) सुरू झाली. 11 जुलै अंतिम मुदत असून, आज दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वाला अपक्ष 
तथा भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार नवनाथ दारकुंडे यांना प्रभाग 2 "ब' मधून तसेच पत्नी जोत्स्ना दारकुंडे प्रभाग 2 "क' मधून अर्ज दाखल करायचा होता. त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागणार असल्याने त्यांनी दोन्हींच्या अर्जापोटी पाच हजारांची रक्कम एक-दोन व पाच रुपयांच्या चिल्लरच्या स्वरूपात आणली. 1 व 2 रुपयांचे चिल्लर आणल्याने मनपा कर्मचाऱ्यांना पैसे मोजण्यात दीड ते दोन तासाचा अवधी लागला. 

साडेचौदा किलो वजनाची चिल्लर 
निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नगरसेवक दारकुंडे यांनी 14 किलो 400 ग्रॅम वजनाची चिल्लर थैलीत आणून अनामत रक्कम भरण्याच्या टेबलावर ठेवली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कक्षातील लिपिक जगन्नाथ पवार यांची धांदल उडाली. जेवणासाठी गेलेले अन्य कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून चिल्लर मोजण्याचे काम सुरू केले. 

आधी आमचे घ्या, चिल्लर नंतर मोजा 
चिल्लर मोजत असताना माजी नगरसेवक कैलास सोनवणे हेदेखील प्रभाग दोनमधून त्यांच्यासह मुलाच्या उमेदवारीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी आले. चिल्लर पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी "आधी आमचे पैसे घेऊन अनामत रक्कम जमा करा.. चिल्लर नंतर मोजत बसा' असे सांगितले. 

सोनवणेंकडून चौघांची अनामत 
कैलास सोनवणेंनी प्रभाग दोन "ड' मधून, पत्नी भारती व स्नुषा काजल जयदीप सोनवणे या दोघांसाठी चार "ब'मधून, मुलगा कल्पेशसाठी प्रभाग दोन "ब'मधून अनामत रक्कम भरली आहे. 

अन्य पक्षातील धनदांडग्या उमेदवारांसारखे आम्ही नाहीत. पाच वर्षांत दैनंदिन कामातून गोळा केलेले एक-दोन रुपये निवडणूक खर्चासाठी बाजूला काढली जात होती. उमेदवारीसाठी भाजपला आधी प्राधान्य असेल. परंतु, दोघांकडून तिकिटासाठी मागणी केलेली आहे. 
- नवनाथ दारकुंडे, अपक्ष नगरसेवक 

Web Title: marathi news jalgaon 5 thusaon chiller