जिल्ह्यात 44 लाख 48 हजार आधार कार्डधारक

जिल्ह्यात 44 लाख 48 हजार आधार कार्डधारक

जळगाव ः आधार कार्ड (युआयडीएआय) हा भारताचे नागरिक म्हणून पुरावा ग्राह्य धरण्यात आला असल्याने प्रत्येकजण आधार काढून घेण्यावर भर देतो. जिल्ह्यात 44 लाख 48 हजार 755 नागरिकांकडे आधार कार्ड आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही आधार कार्ड आवश्‍यक असल्याने त्यांचे प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आधार कार्ड काढले आहेत. अद्यापही जिल्ह्यात शाळांमध्ये आधार नोंदणीचे 20 टक्के काम बाकी आहे. 

जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाखांवर आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम वेगात सुरू आहे. मध्यंतरी काही महिने काम बंद होते. नंतर मात्र आधार नोंदणी पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे आतापर्यंत 44 लाख 87 हजार 755 नागरिकांचे आधारकार्ड काढून पूर्ण झाले आहे. याची टक्केवारी 105 टक्के आहे. 
 
जिल्ह्यात 135 केंद्रे 
आधारकार्ड काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात 135 ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू केली आहेत. आधार नोंदणी करताना होणारी आर्थिक पिळवणूक पाहता आता हे केंद्रे शासकीय इमारतीच्या प्रांगणातच आहेत. नवीन आधारकार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. जर काढलेल्या आधार कार्डातील पत्त्यात बदल, नावात बदल, वयात बदल आदी दुरुस्तीसाठी पंचवीस रुपये लागतात. त्याशिवाय काहीही खर्च येत नाही. 
 
37 हजार विद्यार्थी कार्ड विनाच 
जिल्ह्यात 0 ते 6 वयोगटातील 2 लाख 73 हजार 581 बालके आहेत. त्यापैकी 2 लाख 28 हजार 572 बालकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 96 हजार 201 आहे. त्यापैकी 6 लाख 58 हजार 887 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढलेले आहेत. 37 हजार 314 विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्याप बाकी आहे. 
 
तालुकानिहाय आधार कार्डे अशी 
तालुका--आधार कार्ड 
जामनेर--10 लाख 95 हजार 146 
जळगाव--4 लाख 30 हजार 343 
चाळीसगाव--4 लाख 11 हजार 399 
भुसावळ--3 लाख 14 हजार 542 
रावेर--2 लाख 75 हजार 298 
पाचोरा-2 लाख 69 हजार 114 
यावल--2 लाख 48 हजार 368 
चोपडा--2 लाख 36 हजार 709 
अमळनेर--2 लाख 19 हजार 492 
धरणगाव--1 लाख 95 हजार 433 
भडगाव--1 लाख 76 हजार 713 
एरंडोल--1 लाख 76 हजार 467 
पारोळा--1 लाख 55 हजार 605 
मुक्ताईनगर--1 लाख 59 हजार 966 
बोदवड--93 हजार 160 
एकूण--44 लाख 48 हजार 755 
 
 
जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांचे आधार कार्डाचे काम पूर्ण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांची दहा ते वीस टक्के आधार नोंदणी बाकी आहे. ती मार्चपर्यंत पूर्ण होईल. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी पैसे लागत नाहीत. निःशुल्क काढून मिळते. 
-रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी महसूल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com