आदिवासी विद्यार्थ्यांचा हिरावला घास

सुनील पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

चोपडा : जिल्हाभरातील खासगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त दरात गहू, तांदूळ पुरविण्यात येतो. मात्र, गेल्या 8 ते10 महिन्यांपासून जिल्ह्यात अनुदानित आश्रमशाळांचा गव्हाचा घासच यंत्रणेने हिरावून घेतला आहे. काही आश्रमशाळांना सहा ते सात महिन्यांपासून गहू मिळालाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. 

अनुदानित आश्रमशाळांना यंत्रणेने गव्हाऐवजी तांदळाचा पुरवठा वाढवून दिला आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना लहान मुलांच्या शालेय पोषण आहारासारखा केवळ भात, खिचडीचा आहार मिळत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या ताटातून गव्हाची पोळीच यंत्रणेने गायब करून टाकली आहे. यावर कहर म्हणजे शासन या आश्रमशाळांना बाहेरून रेशनचे धान्य विकत घेण्यास परवानगी देत नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना रोज केवळ भात, खिचडीच कशी खाऊ घालावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकंदर गव्हाच्या अत्यल्प नियतनामुळे आश्रमशाळा संस्थाचालक अडचणीत आले आहेत. 

यंत्रणेचा आदेशाला फाटा 
निवासी अनुदानित आश्रमशाळांना "बीपीएल'च्या नियमित नियतनातून प्रती विद्यार्थी दर दिवशी 400 ग्रॅम गहू व 100 ग्रॅम तांदूळ या प्रमाणानुसार महिन्यास एका विद्यार्थ्यास 12 किलो गहू व 3 किलो तांदूळ यानुसार पुरवठा करण्याचे आदेश आहेत. पण, यंत्रणेने शासनाच्या या आदेशाला फाटा दिला असून, तब्बल 8 ते 10 महिन्यांपासून गव्हाचा पुरवठा महिन्याला प्रतिविद्यार्थी 3 किलो गहू, 12 किलो तांदूळ यानुसार पुरवठा होत आहे. 

32 
अनुदानित आश्रमशाळा 

19,400 
आदिवासी विद्यार्थी 

गव्हाच्या नियतनाबाबत स्थानिक स्तरावर समायोजन करण्याचे तहसीलदार यांना आदेश दिले आहेत. कोणत्या संस्थेला गव्हाचे नियतन मिळत नसेल तर तसे सांगावे. व्यवस्था करू मात्र, तसे काही नाही. 
 राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: marathi news jalgaon aadiwashi student