आंध्रातून सुरतला जाणारे बारा लाखांचे मासे फस्त 

आंध्रातून सुरतला जाणारे बारा लाखांचे मासे फस्त 

जळगाव : आंध्र प्रदेशातून सुरत पाठवलेल्या 12 लाखांचे मासे घेऊन निघालेला ट्रक जालना येथे अडवून चालक-क्‍लीनरचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर चालक क्‍लिनरला जळगावच्या तांबापुरात 3 दिवस डांबून ठेवत माशांची विल्हेवाट लावून खाली ट्रक खामगावजवळ सोडून देण्यात आला होता. मुंबईच्या व्यापाऱ्याला विकलेल्या 3 लाखांच्या माशांच्या पॅकिंगवरून गुन्ह्याची उकल झाली असून तांबापुरातील तीन भामट्यांना अटक करण्यात आली आहे. 

आंध्रप्रदेशातील व्यापारी सुभैय्या मनिक्‍यलाराव कौलम यांचा ट्रक (अे.पी.07 टि.बी.6989) मध्ये 5 सप्टेंबरला 10 टन 400 किलो मासे घेऊन चालक कोट्टा श्रीनिवासराव राममूर्ती, क्‍लीनर प्रभाकर निक्‍यकोलाराव कौलम असे दोघे सुरत (गुजरात)च्या दिशेने निघाले होते. मात्र, वाटेतच ट्रक डुकी पिंप्री (जालना) येथे इंडिकामधून आलेल्या 4 भामट्यांनी ट्रक अडवला. ट्रकमधील दोघांना कारमध्ये डांबत चाकू लावून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. 

मुंबईत फुटली बोंब 
सुरतच्या व्यापाऱ्याचे प्रस्त मोठे असल्याने त्याने, मच्छी पॅकिंग सहित येणाऱ्या व चोरी झालेल्या खास मालाची माहिती मुंबई बाजारपेठेत व्यापाऱ्यांना व्हॉटस्‌ऍपवर शेअर केली. मच्छीच्या थर्माकोल पॅकींगला पिवळी पट्टी लावलेली होती. त्याचे चित्र मुंबईतील व्यापाऱ्याने सुरतच्या व्यापाऱ्याला टाकले. त्यावरून जळगावच्या सलीम मच्छीवाल्याचे नाव उघड झाले. तेथूनच सर्व चक्र फिरले. 

एलसीबीला लागली भनक... 
पोलिसांच्या व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर गुन्ह्याची माहिती व्हायरल झाली होती. अशातच, तांबापुरातील सलीम मच्छी याची बऱ्यापैकी मौजमजा सुरू असून बाहेरच्या राज्यातील लोकही दिसल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, तांबापुरच्या सलीम मच्छीसह मच्छिबाजारावर नजर ठेवून होते. त्यांना खात्री झाल्यावर पोलिस पथकाने तांबापुरात धाड टाकत सलीम मच्छी वाल्याचा मुलगा इद्रिस याला पकडून जालना पोलिसांना सोपवले, त्यानंतर आज शकील ऊर्फ महाराज शेख बाबू व त्याचा साथीदार रिझवान अली रजाअली खातीब (गेंदालालमील) अशा दोघांना अटक केली. 

ती...कार गॅरेज मध्ये 
चक्क ट्रक लूटल्यावर माल जळगावी उतरवण्यात आला...हा माल शिरपुरसह, मुंबई आणि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकला गेला. तो पर्यंत चालक-क्‍लीनर यांना तांबापुरा मच्छीबाजारात डांबून ठेवण्यात आले होते, तर गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार जळगावच्या ऑटोनगर मधे एका गॅरेजवर कामासाठी लावून देण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com