"प्रतिपंढरपूर'त भरला विठ्ठलभक्‍तांचा मळा! 

live photo
live photo

जळगाव ः "जानकाबाई की जय', "विठ्ठल विठ्ठल जय हरिविठ्ठल'च्या जयघोष आणि रथावर पावसाचा शिडकाव अन्‌ तल्लीन झालेल्या भाविकांच्या मेळ्यात आज प्रतिपंढरपूर असलेल्या पिंप्राळानगरी दुमदुमून निघाली होती. आषाढीनिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवात भक्‍तांच्या गर्दीने परिसर चैतन्यमय झाला होता. 
श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ व ग्रामस्थांच्यावतीने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव साजरा करण्यात येत असतो. 143 वर्षांची अखंडीत असलेल्या रथोत्सवाच्या परंपरेने अवघी पिंप्राळानगरी दुमदुमली. उपनगरात सकाळपासूनच विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी होती. पहाटे विठ्ठल मंदिरात महेश वाणी यांच्या हस्ते अभिषेक झाला. रथाला गुलाबाच्या फुलांनी सजविण्यात आले होते. दुपारी बाराला पंढरीनाथ वाणी यांनी सपत्नीक रथाची पूजा केली. यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंदू पटेल, खासदार ए. टी. पाटील, माजी महापौर ललीत कोल्हे, महापालिका आयुक्‍त चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते रथाची महाआरती होवून रथ मिरवणुकीस सुरवात झाली. याप्रसंगी पीपल्स्‌ बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, नगरसेविका प्रतिभा कापसे, अमर जैन, रथोत्सव समितीचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष पंढरीनाथ वाणी आदी उपस्थित होते. 
 
जयघोषात मिरवणुक 
प्रतिपंढरपुरात विठ्ठल नामाचा गजर दिवसभर घुमला. दुपारी एकला रथ मिरवणुकीस "जानकाबाई की जय', "विठ्ठल विठ्ठल जय हरिविठ्ठल' असा जप करीत सुरवात झाली. याच वेळी पावसाचा शिडकाव सुरू असल्याने भाविकांचा उत्साह अधिकच द्विगुणिक झाला होता. रथावरील राधाकृष्ण, अर्जुन (सारथी), घोडे, गरुड, हनुमान या मूर्ती तसेच उत्सवमूर्तीची पुजा झाली. पिंप्राळ्याच्या मुख्य चौकात सायंकाळी रथ आला. तेथे भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. रथाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर गावाहूनही मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com