क्‍लीनचिट दिलेल्या मंत्र्यांची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी : आमदार अबू आझमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भ्रष्ट्राचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना "क्‍लीनचीट' देण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यांनी जेवढ्या मंत्र्यांना क्‍लीनचिट दिली आहे. त्या सर्वांची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असून देशाची घटना बदल्यांच्या तयारीत ते असल्याचा आरोपही आमदार आझमी यांनी यावेळी केला. 

"एमआयएम' करतो द्वेष पसरविण्याचे काम 
एम.आय.एम.हा पक्ष केवळ मुस्लीमांसाठी काम करतो. तो भाषणांतून द्वेष पसरविण्याचे काम करतो. तर समाजवादी पक्ष हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई बांधवांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी, जनता दल इतर पक्षांसोबत येऊन भाजप, कॉंग्रेसला मोठा विरोधक निर्माण करण्याची ताकद आगामी काळात समाजवादी पक्ष निर्माण करेल असा विश्‍वासही श्री. आझमी यांनी व्यक्त केला. 
भारतात लोकशाही असताना सत्ताधारी न्याय धर्माच्या नावावर करीत आहे. मोदी सरकारचा न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप वाढला आहे. अनेक कायदे, नियम त्यांच्याबाजूने ते करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ते बदलविण्याच्या तयारीत आहे. हा मोठा धोका भारताला आहे. देशभरात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. महिला, मुलींवर अत्याचार, खुनाच्या घटना घडताहेत. देशाचा विकास ठप्प झालेला आहे. हिंदू, मुस्लीम धर्माच्या नावावर मतदान व्हायला नको पाहिजे यासाठी, सांप्रदायिकता नाहीशी झाली पाहिजे. गैरव्यवहार थांबला पाहिजे असे मुद्दे घेऊन समाजवादी पक्ष आगामी काळात देशभरात व्याप्ती करेल. 
 
महापालिका निवडणूक लढणार 
समाजवादी पक्षातर्फे जळगाव महापालिका निवडणुकीत पन्नास उमेदवार उभे केले जातील. ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे ते सोबत येऊ शकतील. मात्र आम्ही सांगू त्या अटीवर युती होईल. नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. समांतर रस्ते झाले पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे आदी मुद्दांवर महापालिका निवडणूक लढवू. 

Web Title: marathi news jalgaon abu aazmi press confarnce