माजी आमदार शिरीष चौधरींच्या बहिण अपघातात ठार 

Snehja rupwate
Snehja rupwate

जळगाव ः पाळधीजवळ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात विधानसभेच्या रावेर मतदार संघातील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा रूपवते (वय 65) या ठार झाल्या असून, अन्य तिघे जखमी आहेत. 
पाळधीजवळ झालेल्या कार अपघातात मृत झालेल्या स्नेहजा प्रेमानंद रूपवते या राज्याचे माजी मंत्री (कै.) मधुकरराव चौधरी यांच्या कन्या तर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिणी होत्या. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्ताने त्या आल्या होत्या. शनिवारी लग्नसोहळा पार पडल्यानंतर आज त्या नातेवाईकांसह मुंबईकडे कारने रवाना झाल्या होत्या. मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातला. पाळधीजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव वेगात असलेली कारचे टायर फाटल्याने नियंत्रण सुटल्यामुळे कारने तीन- चार पलट्या घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यात स्नेहजा रूपवते या जागीच ठार झाल्या तर कार चालकासह अन्य दोघेजण जखमी असून त्यांना जळगावी खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com