स्कॉर्पिओच्या धडकेत गडावर जाणाऱ्या तीन महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

अमळनेर : स्कार्पीओ या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने सप्तश्रृंगी गडावर पायी जाणाऱ्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास डांगर- चोपडाई कोंढावळजवळ घडली. या महिलांना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

लताबाई विश्‍वास पाटील, सुनंदाबाई अशोक पाटील, प्रतिभाबाई बाळू पाटील (सर्व रा. मंगरुळ) या तिन्ही आज सकाळी सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी एका पायी दिंडीत सहभागी झाले होते. चोपडाई कोंढावळ ते डांगर दरम्यान स्कार्पीओने (एमएच19सीएफ1696) या महिलांना धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी महिलांना तत्काळ धुळे येथील सिद्धेश्वर मल्टीपेसिलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांच्या हातापायाला, तोंडाला, डोक्‍यालाही गंभीर दुखापती झाल्या आहेत. सहायक फौजदार संजय कंखरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वाहनाची तोडफोड केली. 

Web Title: marathi news jalgaon accident woman