रेतीच्या ट्रैक्‍टरने शाळकरी विद्यार्थ्यांना उड़विले; दोघांचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

जळगाव : यावल तालुक्‍यात मनुदेवी आडगाव फाट्यावर आज पहाटे चिंचोली शाळेजवळ भरधाव रेतीच्या टॅक्‍टरने तीन शाळकरी विद्यार्थ्यांना उडविल्याची घटना घडली. यात दोन जण ठार; तर गंभीर जखमी आहे. 

जळगाव : यावल तालुक्‍यात मनुदेवी आडगाव फाट्यावर आज पहाटे चिंचोली शाळेजवळ भरधाव रेतीच्या टॅक्‍टरने तीन शाळकरी विद्यार्थ्यांना उडविल्याची घटना घडली. यात दोन जण ठार; तर गंभीर जखमी आहे. 
सातपुड्यात असलेल्या मनुदेवी देवस्थानी जाणाऱ्या रस्त्यावरील आडगाव फाटा आहे. येथून जवळच असलेल्या चिंचोली येथील शाळेत सकाळी मुले जात असताना रेतीने भरलेल्या भरधाव ट्रैक्‍टरने तिन मुलांना उडविले. यात दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी आहे. जखमी विद्यार्थ्यास तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघातानंतर ट्रॅक्‍टरवरील चालक फरार झाला असून, संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्‍टर पेटवून दिले. तसेच ग्रामस्थांचा पोलिस व महसूल प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्‍त केला. 

Web Title: marathi news jalgaon adawad scho0l boy dead trackter acident