विद्यार्थ्यांच्या प्रवेशात "लॉ'च्या "सीईटी'चा खोडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

जळगाव : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे गेल्या वर्षापासून विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी "सीईटी' सुरू करण्यात आली असून, 22 एप्रिलला पाचवर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी "सीईटी' झाली. निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण होण्यात तीन-चार महिने जातात, डिसेंबर उजाडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असा गेल्या वर्षीचा अनुभव यंदाही येत असल्याने विद्यार्थी चिंतित आहेत. 

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 22 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत 16 हजार 581 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 15 हजार 98 विद्यार्थी "सीईटी' परीक्षेला बसले. गेल्या महिन्यात ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून, यात 15 हजार 91 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. "सीईटी' निकालानंतर सामाईक प्रवेश कक्षातर्फे 12 जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया अजूनही सुरू न झाल्याने वर्ग सुरू होण्यास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिना उजाडणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. 
 
पदवीलादेखील विलंब 
तीनवर्षीय पदवी विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी "सीईटी'देखील 17 जूनला घेण्यात आली. या अभ्यासक्रमाचा निकाल 28 जूनला जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतरच त्याचीदेखील प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, या प्रवेशप्रक्रियेसही विलंब होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबर उजाडला... 
गेल्या वर्षी पाचवर्षीय व तीनवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेलादेखील विलंब झाला होता. "सीईटी', त्याचा निकाल व नंतर प्रवेशाचे राउंड, अशी प्रक्रिया राबवत चक्क डिसेंबर उजाडला होता. डिसेंबर महिन्यात इतर मुलींचा अर्धा अभ्यासक्रम पूर्ण होण्यात येत असताना विधी शाखेचे मात्र महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करताना खूप अडचणी आल्या. 
 
Web Title: marathi news jalgaon addmition cet