बंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

जळगाव : आदर्शनगरातील "प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी चौघांना चौकशीअंती न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे, अकरावा संशयित राजू जगदेव बोबडे यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह चौघा संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या सर्व घटनाक्रमात उपयोगात आलेले बनावट लायसन्स, आधारकार्ड एका वकिलाने तयार केल्याची माहिती समोर आली आहे. 

आदर्शनगरातील प्रभाकर शंकरराव टिकले यांच्या मालकीचा "प्रसाद' बंगला शुभम पाटील याने बनावट मालक उभा करून परस्पर विक्री केला होता. या गुन्ह्यातील 10 संशयितांपैकी 8 संशयितांना अटकेनंतर तपासाधिकारी भागवत पाटील यांनी चौकशी अंती चार संशयितांना न्यायालयीन कोठडीत व उर्वरित चौघांची पुन्हा कोठडी मिळवली होती. त्यात सूर्यकांत भालेराव, रवींद्र भोई, गौरव तिवारी, शुभम पाटील यांचा समावेश आहे. या चौघांच्या चौकशी नंतर पोलिसांनी राजू जगदेव बोबडे याला काल संध्याकाळीच अटक केली. अटकेनंतर पाचही संशयितांना आज न्या. सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पाचही संशयितांना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले असून सरकारपक्षातर्फे ऍड. किशोर तडवी यांनी कामकाज पाहिले. 
 
वकील साहेब सापडेना 
तपासाधिकारी भागवत पाटील यांच्या तपासात मास्टरमाईंड शुभम पाटील व मिळकत खरेदी करणारा सूर्यकांत भालेराव या दोघांनीच गुन्ह्यांची संपूर्ण रचना आखल्याचे समोर आले असून, खरेदीखत करते वेळी हजर करण्यात आलेल्या खोट्या मूळ मालकाला हेच प्रभाकर टिकले असल्याचे सांगणारी चौकडी उभी केली. दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेले बोगस व खोटा चालक परवाना, आधारकार्ड ऍड. हेमंत दाभाडे यांनीच मिळवून दिल्याची माहिती शुभमने दिल्याचे श्री. पाटील म्हणाले. ऍड. दाभाडेंना या प्रकरणात चौकशीला बोलावण्यात आले मात्र आजवर ते, येऊ शकले नाहीत त्यांच्या घरीही संपर्क साधला मात्र उपयोग झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
झेरॉक्‍स वाल्यांना समज 
गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दस्तऐवजात वापर झालेले बनावट दस्तऐवज आणि खोटी कागदपत्रे मोहाडी रोडवरील निर्मिती झेरॉक्‍स सेंटरवर तयार झाली असून त्याच्या संचालकांनाही निरीक्षक बापू रोहोम यांनी चौकशीला बोलावले होते. चौकशी दरम्यान त्यांना समज देण्यात आली आहे. 

Web Title: marathi news jalgaon advocate frod document