जळगावला मार्चअखेरपर्यंत चोवीस तास विमानसेवा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

जळगाव ः कुसुंबा (ता. जळगाव) येथील विमानतळावर मार्च 2019 पासून चोवीस तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश विमान सेवा प्राधिकरणाचे आहे. त्यानुसार जानेवारीपासून कामकाजास सुरवात होणार आहे, अशी माहिती विमान सेवा प्राधिकरणाचे व्यवस्थापक विकास चंद्रा यांनी आज "दिशा'समितीच्या सभेत दिली. यासाठी कुसुंब्याकडून नशिराबादला जाणार रस्ता कायमचा बंद केला जाणार आहे. नदीवर पूल बांधून नदीचा प्रवाह बदलविला जाईल. 

जळगाव ते मुंबई विमानसेवा काही महिने सुरू होती. ती आता थंड बस्त्यात पडली आहे. याबाबत खासदार पाटील यांनी बैठकीत प्रश्‍न विचारला होता. त्यावर श्री.चंद्रा म्हणाले, की केंद्र शासनाने विमान सेवेबाबत टेंडर काढले होते. ते एअर डेक्कन कंपनीने घेतले. जळगाव ते मुंबई व मुंबई ते जळगाव अशी विमानसेवा सुरू केली. मात्र मुंबईत विमान उतरविण्यास स्लॉट न मिळाल्याने ही सेवा बंद पडली. जळगावचे विमानतळ मोठे आहे. येथून 150 आसनी विमानसेवा चोवीस तास सुरू करण्याबाबत विमान प्राधिकरणाने ठरविले आहे. 15 जानेवारीस चोवीस तास विमानसेवा सुरू करण्याबाबत लागणारी जागा, इतर बाबींचे काम सुरू करण्यात येणार आहे. 31 मार्च 2019 ते पूर्ण केले जाईल. त्यासाठी अजून जमीन भूसंपादन करावी लागेल, नशिराबादकडे जाणारा रस्ता बंद करावा लागेल, विजेची लाइन स्थलांतर करावी लागेल, अनेक ठिकाणची वृक्ष काढावी लागतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. 

एअर डेक्कनचा करार रद्द झाल्यानंतरच 
एअर डेक्कन कंपनीसोबत झालेला करार जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत नवीन कंपनीला विमान सेवेचे कंत्राट देता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. चोवीस तास विमानसेवा सुरू जमीन संपादित करावी लागेल. नशिराबाद कडील रस्ता बंद करावा लागेल. त्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. नदीवर पूल बांधून वळवावे लागेल. उच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत. तिचे स्थलांतर करावे लागेल. काही ठिकाणची झाडे तोडावी लागतील त्याबाबत कार्यवाही सूरू आहे.

Web Title: marathi news jalgaon aeroplane march ending