लेणीदर्शनासाठी अभ्यागत केंद्रातून बुकिंग : मंत्री रावल

विलास जोशी
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

वाकोद (ता. जामनेर), ता. 24 : फर्दापूर टी पॉइंट येथील अभ्यागत केंद्रातून अजिंठा लेणीदर्शनासाठी तिकीट बुकिंग होणार असल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

वाकोद (ता. जामनेर), ता. 24 : फर्दापूर टी पॉइंट येथील अभ्यागत केंद्रातून अजिंठा लेणीदर्शनासाठी तिकीट बुकिंग होणार असल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

अजिंठा लेणीत आज 29 बौद्ध राष्ट्रातील 200 प्रतिनिधींनी भेट दिली. यानिमित्त आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय पर्यटन सचिव रश्‍मी वर्मा, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक दिलीपकुमार खमरी, उपअधीक्षक श्रीकांत वाजपेयी, ऑर्कीऑलॉजिस्ट किशोर चलवादी, वरिष्ठ संवर्धन सहाय्यक डी. एस. दानवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड आदी उपस्थित होते. 
श्री. रावल म्हणाले, अजिंठा लेणीची निर्मिती बावीसशे वर्षांपूर्वी झाली. या लेण्यांची सुंदरता, चित्रशैली, शिल्पकला अजूनही शाबूत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध बौद्ध राष्ट्रातील दोनशे प्रतिनिधींच्या सहाव्या जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन अजिंठा लेणीत केल्याने मुख्यमंत्री व जपान सरकारचे त्यांनी आभार मानले. आज लेणी क्रमांक 1, 2, 16 व 17 या ठिकाणी जपान, कोरिया, तैवान, चीन, श्रीलंका आदी देशातील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. दोनशे प्रतिनिधींना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अजिंठा लेणीचे माहिती पुस्तक भेट दिले. 
 
अजिंठा अभ्यागत केंद्र सुरू 
दीड वर्षापासून बंद असलेले अभ्यागत केंद्र आजपासून पूर्ववत सुरू होणार आहे. लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला अभ्यागत केंद्रात तिकीट काढून मगच पुढे जाता येईल अशी माहिती जयकुमार रावल यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. 

Web Title: marathi news jalgaon ajintha leni booking