जळगावकरांना दिलासा... त्या सर्व 27 संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह 

जळगावकरांना दिलासा... त्या सर्व 27 संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह 

जळगाव : शहरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. तसेच सर्वत्र भितीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. त्या रुग्णाच्या कुटूंबियांसह त्याच्या संपर्कात असलेल्या 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे सध्यातरी कोरोनापासून जळगावकरांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने देखील सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. 

गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या 49 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. शहरात पहिला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन देखील खळबळून जागे झाले. दरम्यान त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटूंबियांसह त्याच्या संपर्कात असलेल्या सुमारे 23 जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेत. त्यांना शहरातील एका महापालिकेच्या रुग्णालयात कोरंनटाईन केले होते. तसेच याचबरोबर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या इतर चार संशयीतांसह या 23 जणांच्या थुंकींचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते. 

अहवालाच्या प्रतिक्षेमुळे वैद्यकीय क्षेत्रात साशंकता 
त्या पॉझिटिव्ह रुगणाच्या संपर्कातील 23 जणांसह इतर चार जणांची नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र एक दिवस उलटून देखील त्या संशयीतांचे अहवाल प्राप्त न झाल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेसह नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आज सकाळीच सर्व 27 संशयीतांचे अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांना प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती त्यांनी दिली. 

उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सोडला सुटकेचा निश्‍वास 
कोरोनाच्या संशयीत रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील काही खासगी डॉक्‍टरांकडे उपचार घेत होता. दरम्यान त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते डॉक्‍टर देखील भयभीत झाले होते. दरम्यान पोलिसांनी त्या खासगी डॉक्‍टरांचा शोध घेत त्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविले होते. मात्र त्या डॉक्‍टरांचा अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने त्या डॉक्‍टरांनी देखील आज सुटेकचा निश्‍वास सोडला. 

त्या अहवालामुळे मोठे संकट टळले 
शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आज त्या रुग्णाच्या कुटूंबियांसह त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे जळगावकरांना हा अहवाल दिलासा देणार ठरला असून जिल्ह्यावर आलेले मोठे संकट टळले असल्याची प्रतिक्रिया काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com