गुड न्यूज... अमळनेर कोरोना "पॉझिटिव्ह' ते 'निगेटिव्ह'

गुड न्यूज... अमळनेर कोरोना "पॉझिटिव्ह' ते 'निगेटिव्ह'

जळगाव ः "कोरोना' संसर्ग टाळण्यासाठी स्वयंशिस्त हाच प्रभावी उपाय आहे. तोच उपाय अमळनेरकर नागरिकांनी पाळला. याचाच परिणाम म्हणून कोरोना "हॉटस्पॉट' असलेला अमळनेर तालुका आज ऑरेंज झोनमध्ये आला आहे. नागरिकांनी पाळलेल्या स्वयंशिस्तीचा, प्रशासन, पोलिसांनी समन्वयाने राबविलेल्या उपाय योजनांमुळे हे शक्‍य झाले आहे. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेरचा "थ्री लेयर' पॅटर्न जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनो संसर्गाची लागण जळगाव जिल्ह्यात झालेली असताना मुंगसे (ता. अमळनेर) येथील पहिली महिला पॉझिटिव्ह आढळली. तिचा मुलगा पुणे येथून आल्यानंतर इतरांना संसर्ग होत गेला अन्‌ पाहता पाहता काही दिवसातच अमळनेरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. अमळनेर कोरोनाच हॉटस्पॉट बनले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तब्बल सहा वेळा तेथे जाऊन नागरिकांना स्वयंशिस्त पालनाचे आवाहन केले. आरोग्य विभागाला पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी, त्या नागरिकांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी अशी तिहेरी स्तरावर तपासणी झाल्याने कोरोना पॉझिटीव्हची संख्या वाढली.

मात्र पुढील धोका टळला. 
आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे आदींनी नागरिकांना शिस्तीचे आवाहन केले होते. सलग काही दिवस जनता कर्फ्यू पाळला गेला. अनेक परिसर प्रतिबंधित करण्यात आला. याचा एकत्रित परिणाम प्रशासन, पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने कोरोनोचे रुग्ण संख्या वाढ थांबविण्यात यश मिळविले. 


अमळनेर कोवीड सेंटरची स्थिती 
एकूण स्वॅब घेतलेले रुग्ण-448 
त्यापैकी पॉझिटिव्ह रूग्ण- 82 
निगेटिव्ह रुग्ण-366 
जळगावला पाठविलेले बाधित-13 
लक्षणे नसल्याने घरी गेलेले-65 
आज उपचार घेणारे पॉझिटिव्ह-3 
मृत-1 


जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 
अमळनेरचे पॉझिटिव्ह रुग्ण- 21 
घरी गेलेले-15 
उपचार घेणारे--11 
मृत--8 

एकूण बाधित रुग्ण-107 
बरे होऊन घरी गेले-84 
सध्या अमळनेरला दाखल-3 
जळगावला दाखल-11 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com