अमळनेरचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुटे निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

अमळनेर : येथील नगरपालीकेचे मूख्याधिकारी डॉ. ऊत्कर्ष गूटे यांना भुयारी गटार प्रकरण चांगलेच भोवले असून, या प्रकरणातून त्यांना आज प्रशासनाने निलंबित केले आहे. अमळनेर नगरपालिका मूख्याधिकारी पदाचा प्रभारी चार्ज भूसावळचे मूख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्याकडे देण्यात आला असून आज दुपारी तीनला ते पदभार घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. ऊत्कर्ष गूटे यांनी शहरात झालेल्या भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष केले होते. याबाबत त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या पोट नियम (1) (अ )व (ब) नुसार निलंबित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या शहर पाणी पूरवठा नियोजन बैठकीला त्यांचे अनूपस्थित राहणे. तसेच मूंबई येथे भूयारी गटार प्रकरणी सचिव मनिषा म्हैसकर यांनी बोलाविलेल्या बैठकीला कूठलेही कारण न देता अनुपस्थित राहणे. या साऱ्या कारणांमुळे विभागाने त्यांना आज तातडीने निलंबित करण्याचे आदेश काढले. सदर आदेश आज दुपारी नगरपालिकेला प्राप्त झाले असून, त्यांच्या जागेवर भुसावळचे मुख्याध्यापिका श्री.बाविस्कर यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. 

Web Title: marathi news jalgaon amalner nagarpalika